कंगना राणावत ची अंधेरी कोर्टात एक केस सुरू आहे.त्यावेळी कंगना ला कोर्टात हजर राहावं लागलं.ज्या न्यायाधीशांच्या बेंच समोर ही केस सुरू आहे त्या न्यायाधीशांवर कंगनाचा विश्वास नाही.त्यामुळे कंगना कडून न्यायाधीश बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगना राणावत ने गंभीर आरोप केले आहेत.मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने कंगनाला दिला होता.
कंगना राणावत Vs जावेद अख्तर
2020 मध्ये, एका मुलाखतीदरम्यान, कंगना राणावतने (Kangana Ranaut) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित वादग्रस्त विधान केले. या दरम्यान तीने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.त्यामुळे जावेद अख्तर (Javed akhtar) यांनी कंगनावर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला होता.आणि तिच्यावर मानहानीची (defamation case) केस केली.
याप्रकरणी अंधेरी च्या न्यायालयात सुनावणी सुरू होती.सुनावणी दरम्यान जावेद अख्तर सुनावणीस हजार असायचे मात्र कंगणा राणावत सुनावणीस सतत गैरहजर रहात होती,त्यामुळे मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने कंगनाला दिला होता.यामुळे शेवटी कंगणा राणावत ला अंधेरीच्या न्यायालयात अटक टाळण्यासाठी हजर राहावे लागले.
मानहानी प्रकरण
कंगनाचे वकील सिद्दीकी यांनी सांगितले की, ‘जावेद अख्तर यांनी कंगना राणावत ला हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितले होते. त्याचसोबत असेही सांगितले की, तुम्ही दोघे सेलिब्रिटी आहात. ईमेल प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तुझी आणि हृतिकची प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे तू हृतिकची माफी मागून हे प्रकरण मिटवून टाकावे.’
त्यानंतर – सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये कंगनाने जावेद अख्तर हे हिंदी सिनेमासृष्टीमध्ये गटबाजी करता असा आरोप केला होता. तसेच याच मुलाखतीमध्ये तिने अख्तर यांच्याविरोधात आणखी ही काही आरोप केले होते. कंगनाने केलेल्या या आरोपांनंतर जावेद अख्तर कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी तिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.Kangana Ranaut Vs Javed Akhtar defamation case
कंगणाचा जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप
जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचे, धमकी दिल्याचे आरोप कंगना राणावत कडून करण्यात आले आहेत.एवढंच नाही तर कंगनाने आपल्या आणखी एका याचिकेसंदर्भातल्या दोन प्रकरणांची सुनावणी दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्याचीही मागणी केली आहे. त्याबाबत 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
कंगना राणावत चा अंधेरी न्यायालयावर विश्वास
कंगनाच्या वकिल रिझवान सिद्दीकी यांचे असे म्हणणे आहे की कंगना राणावत चा अंधेरी न्यायालयावर विश्वास नाही.
वकील रिजवान सिद्दीकी म्हणाले की, ते प्रकरण हस्तांतरित करण्यासाठी अपील करणार आहेत.
आरोपीने न्यायालयावर अविश्वास दाखवणे,दुसऱ्या न्यायालयात खटला वर्ग करण्याची मागणी करणे
हे भारतीय न्याय व्यवस्थेतील इतिहासात दुर्मिळ चित्र आहे.
न्यायालयावर अविश्वास दाखवणे हे तसे गंभीर प्रकरण आहे.
त्याचे पडसाद समाजात उमटू शकतात.आणि यामुळे समाजात अशाच पद्धतीने मागणी पुढे येवू शकते.
कंगणा राणावत संबंधित पेजथ्री बातम्या आम्ही करत नाही,
मात्र ही बातमी न्यायालयाशी संबंधित असून थेट न्यायाधीश बदलण्याच्या मागणीचा यात मुद्दा असल्याने हे गंभीर आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 20, 2021 17:18 PM
WebTitle – Avni Lekhra carved the name on the gold medal