अहमदाबाद:जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून कर्ज घेतले असेल आणि ते पैसे वेळेवर परत करत नसाल, तर साहजिकच तुम्हाला रिकव्हरी एजंटचे कॉल येतात. एजंट धमकावून पैसे परत करण्यास सांगतात. पण गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अॅपद्वारे कर्ज घेणे एका व्यक्तीला भारी पडलं आहे.रिकव्हरी एजंट ने त्याला कर्ज परत करण्याचा इशाराच दिला नाही तर त्याने पत्नीचा न्यूड फोटो ही शेअर केला. अहमदाबादच्या बेहारपुरा भागातील एका ३४ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, अहमदाबादमधील ही व्यक्ती कोरोनाच्या काळात मोठ्या आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे मित्रांच्या सांगण्यावरून त्याने 28 डिसेंबर 2021 रोजी मोबाईल अॅपद्वारे कर्ज घेतले. त्यांनी 6000 रुपयांचे कर्ज घेण्याचे ठरवले. अनेक चार्जेस वजा केल्यानंतर त्यांना सुमारे 3480 रुपये मिळाले. आठवडाभरानंतर त्यांनी पैसे परत केले.
पैसे परत करूनही धमकावले
आर्थिक अडचणींमुळे या व्यक्तीने 14 वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून 1.2 लाखांचे कर्ज घेतले.
यानंतर त्यांनी जानेवारी महिन्यात 2.36 लाखांचे कर्ज व्याजासह परत केले.
मात्र पैसे परत करूनही त्याला रिकव्हरी एजंटचे फोन येत राहिले.
एवढेच नाही तर ज्या लोकांची नावे त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होती, त्यांनाही धमक्याही मिळू लागल्या.
पत्नीचा नग्न फोटो पाठवून धमकी
वसुली एजंटने त्यांच्या पत्नीचा फोटोही कुठूनतरी काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ते मॉर्फ करून अश्लील बनवले होते. नंतर रिकव्हरी एजंट ने हा न्यूड फोटो ज्याने पहिले कर्ज घेतले त्याला पाठवले. नंतर हा फोटो हा फोटो त्याच्या संपर्क यादीत असलेल्या इतर नातेवाईकांना पाठवला. सायबर क्राइम पोलिसांनी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नग्न फोटो पाठवणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी धमकावल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिका-यांनी सांगितले की, सायबर क्राईम करणारे बदमाश, सहज कर्ज देण्याचे आश्वासन देऊन, पीडितांच्या फोनवर एक्सेस मिळवतात, ज्याचा वापर करून ते केवळ कर्ज घेणार्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या संपर्क यादीतील लोकांना देखील धमकावतात. अनेक प्रकरणांमध्ये, व्यक्तीचे फोटो आणि वैयक्तिक व्हिडिओ मिळवले जातात आणि अधिक पैशांची मागणी करण्यासाठी ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
आर्यन खान:समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 03, 2022 10:05 AM
WebTitle – Debt recovery agent shared nude photo of wife, filed crime