धारवाड : जानेवारी 15, शुक्रवारी सकाळी 8 याच्या सुमारास कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात दावणगिरी येथील महिला डॉक्टरांच्या बसला भीषण अपघात झाला असून यात 13 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी आहेत.
दावणगिरी येथील डॉक्टर्स महिला मंडळाचा 16 डॉक्टरांचा चमू एका कार्यक्रमासाठी गोव्याला जात होता,यातील बहुतांश महिला डॉक्टर्स या स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे समजते.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 येथे हा अपघात झाला.महिला डॉक्टरांची मिनीबस
आणि टिप्पर (डंपर) ची जोरदार धडक झाली.
टिप्परचा चालक आणि त्यामध्ये प्रवास करणार्या पाच महिला देखील गंभीर जखमी झाल्या असून
त्यांना KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दावणगिरी महिला डॉक्टरांच्या बसला अपघात
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील नरेंद्र क्रॉस रोड ते गॅबूर क्रॉस रोड दरम्यान हा एक बायपास रस्ता आहे,जो कुप्रसिद्ध अपघाती वळणासाठी ओळखला जातो.साल 2000 हजार मध्ये बनविण्यात आलेला हा दुपदरी रस्ता बनविल्यापासूनच मृत्यूचा सापळा बनला असून आतापर्यंत अनेक लोकांचे बळी घेण्यात कुप्रसिद्ध ठरला.
साल 2016 – 17, 2017 – 14 , 2018 – 17, 2019 – 10, 2021 – 13 अशाप्रकारे इथं बळी गेले आहेत.
हा रस्ता खाजगी तत्वावर बिओटी (BOT) म्हणजे बांधा आणि हस्तांतरित करा अशाप्रकारे बांधला गेला असून खाजगी ठेकेदार नंदी हायवे डेव्हलपर्स या बायपास रस्त्याची देखभाल करत आहेत.हा रस्त्या अत्यंत वर्दळीचा असून तो अतिशय अरुंद पद्धतीने बांधला गेला आहे.
2020 ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री आणि धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी म्हणाले की कायदेशीर अडथळे मिटविण्यात येत आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिका्यांना रस्ता चौपदरीकरणासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सांगितले आहे.या संदर्भात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन संबंधित अधिकाऱ्याना त्यांनी सूचना केल्या होत्या.
नरेंद्र क्रॉस ते गॅबूर क्रॉस दरम्यानचा हा बाईपास रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्र.04 म्हणून ओळखला जातो हा 30 कि.मी. लांबीचा दुपदरी मार्ग असून पुणे आणि बेंगरुळला जोडणारा हा भारतातील सर्वात व्यस्त रस्ता आहे.हे उत्तर कर्नाटकातील दोन महत्त्वाची शहरे म्हणजेच हुबळी आणि बेळगांवला देखील जोडतो. या रस्त्यावर अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांची देखील खूप वर्दळ असते.
अरुंद रस्त्यामुळे तो मृत्यूचा सापळा
हा रस्ता केवळ दुपदरी मार्ग असल्याने प्रवाशांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरला आहे.
या अरुंद रस्त्यामुळे तो मृत्यूचा सापळा बनला आहे. बर्याच वर्षांपासून या रस्त्यावर अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत.
त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता सहा पदरी करावा यासाठी स्थानिक नागरिकांनी ऑनलाइन पिटिशन देखील सुरू केली होती.
महिला डॉक्टरांच्या मोठ्या संख्येतील मृत्यूने या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
या अपघाताने सोशल मिडियात मोठ्याप्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)