देशातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्समध्ये व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले आहे. बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक सतत प्रयत्न करत असताना राजू औषध आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत नाही.58 वर्षीय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना ट्रेडमिलवर हृदयविकाराचा झटका आला. आता त्यांची मुलगी अंतरा हिने चाहत्यांना आवाहन केले आहे की त्यांनी वडिलांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना कराव्यात.
अंतरा श्रीवास्तव पुढे म्हणाल्या, ‘बुधवार दुपारपासून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारली नाही किंवा अतिशय बिघडलेली सुद्धा नाही. संपूर्ण वैद्यकीय संघ आपले सर्वोत्तम देत आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत आणि आशा करतो की ते लवकर बरे होतील. माझी आई अजूनही माझ्या वडिलांसोबत ICU मध्ये आहे.श्रीवास्तव यांच्यावर हृदयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश नाईक यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले. ते बेशुद्ध आहेत,त्यांचा मेंदू काम करत नाही.
डॉक्टर सांगत आहेत की आम्हाला वाट पहावी लागेल. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.
सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असून ते प्रतिसाद देत असल्याची बातमी आली होती पण हळूहळू त्यांची प्रकृती खालावली.
राजू श्रीवास्तव यांची पत्नीही दोन दिवसांपूर्वी मुंबईहून दिल्लीला पोहोचली आहे.
दरम्यान, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही डॉक्टरांशी फोनवरून चौकशी केली.
दोघांनीही राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
गजोधर म्हणून सगळ्यांना हसवणारे राजू
श्रीवास्तव 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन उद्योग क्षेत्रात सक्रिय आहेत, परंतु 2005 मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सीजन मध्ये भाग घेतल्यानंतर ते लोकप्रिय झाले. मैंने प्यार किया, बाजीगर, बॉम्बे टू गोवा (रिमेक) आणि आमदनी अठण्णी खर्चा रुपैया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रीवास्तव ‘बिग बॉस’ सीझन तीनमध्येही सहभागी झाला होता. सध्या श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.त्यांचा गजोधर कॅरेक्टर सर्वात जास्त लोकप्रिय ठरलं होतं.
पोलिसांनी घरोघरी तिरंगा यात्रा रोखली,प्रकरण गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचणार
मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: न्या.प्रतिभा सिंह
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 12,2022, 23:30 PM
WebTitle – daughter gave important information about the health of comedian Raju Srivastava