माणसाला स्वतःच्या अस्तित्वाबाबत नेहमीच प्रश्न पडत आलाय. आपण कुठून आलो? कुठे जाणार? विश्वाची निर्मती कशी झाली? भूतकाळ काय होता? भविष्य काय असणार? मृत्यूनंतर काय होते असे अनेक प्रश्न माणसाला पडू लागले. त्यातून धर्माची आणि तत्वज्ञानाची निर्मिती झाली. तत्वज्ञानातून विज्ञानाची निर्मिती झाली. विज्ञानाने आज आपल्या जीवनाला पूर्णपणे व्यापून टाकले आहे. विज्ञानाच्या साह्याने माणूस दुःख आणि मृत्यूवर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. विज्ञानाची घोडदौड अशीच सुरू राहिली तर एक दिवस विज्ञान माणसाला दुःख आणि मृत्यू या जीवनाचा अनिवार्य भाग असलेल्या परंतु तितक्याच नकोश्या असलेल्या वास्तवापासून मुक्ती देईल आणि मग विज्ञान हाच जगाचा God बनेल.
संपूर्ण दुःख मुक्तीसाठी पूर्ण विनाश घडवणे.
माणसं काही वेदना आयुष्यभर घेऊन जगत असतात. या वेदनेतून मुक्त होण्यासाठी ते आयुष्यभर धडपड करत असतात. भगवान बुद्धांनी तृष्णा, हव्यास हे दुःखाच मूळ कारण असल्याचं सांगितलं. नेटफ्लिक्सची डार्क ही वेब सिरीज त्या सत्याकडे नेमकं बोट दाखवते. तृष्णा, तृष्णेतून निर्माण होणार दुःख आणि त्या दुःखावर मात करण्याच्या विंडेनवासीयांच्या प्रयत्नांची कथा म्हणजे डार्क. डार्क मधले कॅरेक्टर त्यासाठी धर्मा ऐवजी विज्ञानाचा वापर करतात. विज्ञानाच्या साह्याने ते काळाच्या वेगवेगळ्या प्रतलात फिरत दुःख, मृत्यू, विनाश टाळण्याचा प्रयत्न करत असतात. हे कॅरेक्टर इतरांना व स्वतःलाच स्वतःच्या भूतकाळ, भविष्यकाळ वर्तमान काळात भेटत असतात. या भेटण्याचा मुख्य उद्देश विस्कटलेली घडी जशीच्या तशी बसवणे व पुन्हा नवी सुरुवात करणे किंवा संपूर्ण दुःख मुक्तीसाठी पूर्ण विनाश घडवणे.
काळाच्या अनंत वर्तुळात जोनस आणि मार्था ऐकमेकांना वारंवार भेटत असतात. एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग एकमेकांच्या प्रमेपोटी दुःखावर, काळावर मात करण्यासाठी भविष्यकाळात एकमेकांच्या आणि खरं तर स्वतःच्याच विरोधात उभे ठाकत असतात. जोनस मार्था प्रमाणेच ईतर कोणी आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी, कोणी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काळावर मात करण्याचा प्रयत्न करत असत. या धडपडीतुन नात्यांचा प्रचंड गुंता निर्माण होतो. जोनस आणि मार्था जरी वेगवेगळ्या विश्वाच प्रतिनिधित्व करत असले आणि त्यात विश्व आणि प्रतिविश्व अस द्वंद्व दिसत असलं तरी ते तस नाही. आपल्याला काळ-पांढर, उजेड-अंधार अस पहायची सवय असली तरी ते एकाच गोष्टीचे वेगवेगळे डायमेंशन असतात. काळाच्या या चक्राव्यूहातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. पण तो मार्ग सगळं काही संपावणारा आहे. डार्क मधलं जग शेवटी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत पण हे कोसळलेलं जग कोणाचं आहे हे पाहायचं असेल तर डार्क नक्की पहा.
डार्कला शेवटी गुडबाय करताना खूप जीवावर येतं
बॅरन बो ओदर हा डार्कचा निर्माता, डायरेक्टर आहे तर ५ जणांच्या लेखन टीम मधे इतर तिघांच्या व्यतिरिक्त बॅरन बो ओदर आणि त्याची साथीदार जांजे फ्राईज आहेत. डार्क मध्ये केवळ टाइम ट्रॅव्हल नाही तर नात्यांची प्रचंड गुंतागुंत आहे. नात्यांचा ह्या गुंत्यात आपण सुद्धा गुंतून जातो. पटकथेत बायबल मधले संदर्भ आहेत. एमरल्ड टॅबलेट आणि सेलटीक सिम्बॉल्सचा वापर करण्यात आलाय. विंडेंन या जर्मनीतल्या न्यूक्लियर पॉवरप्लांट असणाऱ्या शहरात ही कथा घडते.
माणसांची, गाड्यांची फारशी वर्दळ नसणाऱ्या शांत भासणाऱ्या विंडेंन मधे ३३ वर्षाच्या टाईम सायकल मधे खूप काही घडत असत. सीजन १ आणि २ नंतर झालेली गुंतागुंत सीजन ३ मधे कशी सुटणार याची प्रचंड उत्सुकता होती. गेम ऑफ थ्रोन सारखी निराशा होण्याची दाट शक्यता होती पण शेवट दुःखदायक असला तरी सिरीजच्या आतापर्यंतच्या अपेक्षांना, व्यापकतेला जराही धक्का बसत नाही. पटकथा एवढी टाइट आहे की त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांमध्ये आपण पुरते हरऊन आणि हरखून जातो. प्रत्येक सीजनचा प्रत्येक एपिसोड आपली उत्कंठा वाढवत जातो.
टेक्निकली डार्क सर्वांगाने निव्वळ अप्रतिम आहे. प्रत्येक फ्रेम अतिशय सुंदर आहे.
प्रत्येक एपिसोड मधे एक स्कोर आहे जो त्या एपिसोडला अधिक खुलवतो.टायटल थीम गुडबाय खूप हॉंटिंग आहे.
बॅकग्राऊंड म्युजिक प्रत्येक इमोशनला अधिक अधोरेखित करणार आहे.बॅकग्राऊंड म्युजिक मधे एपाकेलाचा वापर करण्यात आलाय.
सीजन २ मधला मे द एंजल हा माझा फेवरेट स्कोर आहे.अभिनयाच्या बाबतीत प्रत्येकाने स्वतःच काम
एवढं चोख केलं आहे की कलाकारांचा हेवा वाटतो. डार्क ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा माईलस्टोन आहे.
वेळ काढून नक्की पहा. सीजन ३ पाहण्या आधी सिजन १ आणि २ पुन्हा पाहून घ्या.डार्कला शेवटी गुडबाय करताना खूप जीवावर येतं.
by Nitin Divekar
मराठी चित्रपट सृष्टि ढवळून काढणारे “अण्णाभाऊ साठे”
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)