मध्यप्रदेशातील ही घटना आहे.देशातील दलीतांवरील होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही.दररोज कुठेतरी हत्या बलात्कार अशा बातम्या येत असतात.अशीच एक घटना समोर आली असून मध्यप्रदेशच्या छतरपुरची ही घटना आहे.मिडिया रिपोर्ट्स नुसार 25 वर्षीय एका दलित युवकाची दोन तथाकथित उच्चजातीय तरुणांनी बेदम मारहाण करत हत्या केली. त्याचा दोष फक्त एवढाच की त्याने जेवणाच्या ताटाला स्पर्श केला.तेही स्वत:च्याच.जेवणाला हात लावला म्हणून दलित तरुणाची हत्या करण्यात आली.
दोन्ही आरोपी फरार
मृत देवराज अनुरागी याला आरोपी भूरा सोनी आणि संतोष पाल यांनी कामासाठी बोलावले होते.
या दोघांनी पार्टीनंतर छतरपूर जिल्ह्यातील किशनपूर गावात स्वच्छतेसाठी देवराज यांना बोलावले.
हे गाव राजधानी भोपाळपासून 450 किमी अंतरावर आहे. हे उत्तर प्रदेशच्या सीमेला लागूनच आहे.
दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जेवणाला हात लावला म्हणून दलित तरुणाची हत्या
स्थानिक पोलिस स्टेशनने सांगितले की, देवराज अनुरागी यांनी पार्टी दरम्यान स्वत: जेवण घ्यायला सुरुवात केली.याचा राग आल्याने सोनी आणि पाल यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. या दोघांवर खुनाचा आणि एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी म्हटले आहे की आरोपी छोटी शेती करतो.
तर भुरा सोनी ह गुन्हेगारी रेकॉर्ड असणारा आहे.
या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले
आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्यासोबतच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)