अहमदाबाद: गुजरात हादरला: दलित वराने घोडी वर बसताच तलवारी निघाल्या : एकीकडे भारत स्वतःला ‘ग्लोबल टेक लीडर’ आणि विश्वगुरु म्हणून मांडत असताना, दुसरीकडे देशातील हिंदी पट्यात युजीसी आणि आरक्षण व एससीएसटी एक्ट च्या विरोधात तथाकथित उच्च जातीय राजकीय गुंड आंदोलने करत असताना गुजरातच्या पाटन जिल्ह्यातून समोर आलेली घटना देशातील सामाजिक वास्तवावर कठोर प्रश्न उपस्थित करते. पाटनमधील चंद्रुमाना गावात दलित समाजातील विशाल चावडा यांच्या लग्नाचा आनंद क्षणार्धात भयावह वातावरणात बदलला. केवळ दलित वर घोडीवर बसून वरघोडा काढत होता, या कारणावरून काही कथित ‘उच्च जातीय’ व्यक्तींनी तलवारी हातात घेऊन मिरवणुकीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. ही घटना आधुनिकतेच्या दाव्यांआड दडलेल्या मध्ययुगीन जातीयवादी रोगट मानसिकतेचे विदारक दर्शन घडवते.
गुजरात हादरला: दलित वराने घोडी वर बसताच तलवारी निघाल्या
गुजरात मध्ये सोमवारी विशाल चावडा आपल्या लग्नाचा वरात घोडी घेऊन गावातून निघाले होते. ढोल-ताशांचा आवाज, नातेवाईकांचा उत्साह आणि लग्नाची पारंपरिक रीतिरिवाज सुरू असतानाच काही गावकऱ्यांनी रस्ता अडवला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मोठ्याने ओरडत विचारले की, “या गावात दलित माणूस घोडी वर बसायची हिंमत कशी करू शकतो?” काही क्षणांतच संगीत थांबले, तलवारी बाहेर आल्या आणि वरातीत सहभागी लोकांवर मारहाण सुरू झाली.
‘विशेषाधिकार’ मानल्या जाणाऱ्या रितीवर दलिताचा हक्क नाकारला
हल्लेखोरांना हे मान्य नव्हते की, ज्याला ते स्वतःचा ‘विशेषाधिकार’ मानतात, तीच परंपरा दलित समाजातील व्यक्ती कशी काय पाळू शकते. या घटनेत कोणतीही वैयक्तिक शत्रुता नसून, ती उघडपणे जातीय वर्चस्वाच्या मानसिकतेतून घडलेली असल्याचे स्पष्ट होते. दलित वराचा घोडीवर बसणे हे लग्नाचे प्रतीक नसून, कथित उच्च जातीय व्यवस्थेला दिलेले आव्हान असल्याच्या भावनेतूनच हा हिंसाचार झाल्याचे दिसते.
पोलिस कारवाई आणि कुटुंबावर उमटलेले मानसिक जखमांचे चटके
घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवली असून गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला, तरी विशाल चावडा आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला मानसिक आघात सहज पुसला जाणार नाही.
लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी भीती, अपमान आणि असुरक्षिततेचा अनुभव घेणे, ही बाब कोणत्याही लोकशाही समाजासाठी गंभीर मानली जाते.
गुजरातमध्ये वारंवार घडणारी अशी प्रकरणे
ही घटना अपवादात्मक नसून, गुजरातमध्ये दलितांवरील अशा स्वरूपाच्या हिंसाचाराची मालिका वारंवार समोर येत आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये गुजरात मधिल गांधीनगर जिल्ह्यातील चडासना गावात दलित वर विकास चावडा यांना घोडी वरून ओढून खाली उतरवत मारहाण करण्यात आली होती. त्याआधी २०२० मध्ये बनासकांठा जिल्ह्यात, देशसेवेत कार्यरत असलेल्या एका सैनिकाच्या वरघोड्यावर केवळ तो घोडीवर बसला होता या कारणावरून दगडफेक करण्यात आली होती.
‘घोडीवर बसणे’ हे वर्चस्व दाखवण्याचे हत्यार
दलितांनी सामाजिक समतेच्या प्रतीकात्मक रिती पाळू नयेत, यासाठी ‘घोडीवर बसणे’ या मुद्द्याला हिंसक स्वरूप देणे,
हा गावातील जातदांडग्या जातीय गटांचा ठरलेला पॅटर्न बनत चालला आहे.
या घटनांमधून केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संविधानिक समता,मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवरच हल्ला होत असल्याचे दिसते.
ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, तंत्रज्ञान, अंतराळ आणि आर्थिक प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या देशात
सामाजिक सुधारणांची लढाई अजूनही अपूर्ण आहे.
जोपर्यंत अशा जातीय मानसिकतेला ठोस कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर आव्हान दिले जात नाही,
तोपर्यंत ‘विकास’ हा शब्द केवळ आकड्यांपुरता मर्यादित राहण्याचीच भीती व्यक्त केली जात आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 03,2026 | 15:03 PM
WebTitle – dalit-groom-attacked-horse-riding-gujarat-patan-caste-violence























































