दलित हत्याकांड घडल्यावर दलित नेत्यांना शिव्या देणे त्यांच्या चुका दाखवून हे सगळं कसं त्यांच्याच मुळे घडतं असं रंगवणे, हा सुद्धा जातीयवादाचाच एक प्रकार आहे.बकरी जीवानिशी गेली कारण तीला आपला जीव वाचवता आला नाही. ही तीची चूक आहे असं रंगवणे आणि तिचा गळा चिरून तुकडे करणाऱ्या खाटीकास मात्र ब्र शब्दाने न दुखावणे हे कमालीचे अमानवीय धोरण काही लोक राबवत असतात. Django Unchained (Director: Quentin Tarantino 2013) ही गोष्ट 1858-59 या एरा मधली.
डेथफाईट
अलिकडे यात काही प्रस्थापित झालेले दलित सुद्धा (जे स्वत:ला वेगळच काही समजतात)आहेत.कारण त्यांच्या मेंदूत एक गोष्ट रुजवली आहे. की दलित नेत्यांना संपवणे बदनाम करणे हेच दलित सुरक्षेच्या प्रगतीच्या दृष्टीने पर्यायी धोरण आहे.एकदा दलित नेतृत्व संपवले की दलित जनता अलगद आपल्या तंबूखाली एकवटते अशी स्वप्न काही लोकाना पडत असतात.हे सगळं मानवी पातळीवर अतिशय हिणकस आणि क्रूर आहे.संघर्ष फक्त तथाकथित उच्चजातीय लोकांच्या सोबत नाही तर प्रत्येक पातळीवर आहे जो आपल्या मालकाशी ईमान राखत आपल्याच समकक्ष बांधवांना डेथफाईट करायला उद्युक्त करतो.
Django Unchained (Director: Quentin Tarantino 2013) ही गोष्ट 1858-59 या एरा मधली.हा पाश्चिमात्य देशातील आफ्रिकन अमेरिका देशातील अश्वेत लोकांच्या गुलामी प्रथेच्या संदर्भाने भाष्य करणारा चित्रपट.माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक.क्विंटीन टेरंटिनो हा एक आवडता दिग्दर्शक.
Django सर्वप्रथम 1966 मध्ये आला.आतापर्यंत जवळपास 31 Django सिरीज बनल्या आहेत.पैकी दोन पाहिल्या.ही तिसरी.
Franco Nero ने Django ची भूमिका केली आहे.हा इटालियन सिनेमा नंतर क्विंटीन टेरंटिनोने वेगळ्या उंचीवर नेला.
अर्थात हा त्याचा सिक्वेल नाही.डीफ्रेंट प्लॉट आहे.इथं बाउंटी हंटर्स हा दुसरा संदर्भ आहे.
कुख्यात गुन्हेगारांवर त्यांना पकडण्यासाठी (जीवंत-मृत) बक्षिस लावलं जातं.आपल्याकडेही ही पद्धत आहे.
परंतु तिकडे या कामासाठी स्पेशल बाउंटी हंटर्स असतात.जे हेच काम करत असतात.या दोन मुद्यांच्या भोवती ही कथा गुंफली आहे.
गुलामांना आपसात लढवून मरेपर्यंत झुंझत ठेवून शेवटी जो जिंवत राहील तो विजयी
Django Unchained मध्ये तगडी स्टारकास्ट आहे.Jamie Foxx ने Django उत्तम रंगवला आहे.त्याला उभं करणारा.गुलामीतून सुटका करणारा श्वेत Dr. King Schultz (Christoph Waltz) (पेशा दातांचा डॉक्टर परंतु व्यवसाय बाउंटी हंटर्स) इरसाल गॉडफादर उत्तम साकारला आहे. (अश्वेत लोकांना मुक्ती मिळवून देणारा श्वेत उदारमतवादी याविषयाच्या संदर्भाने नंतर बोलू.)
यात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत Leonardo DiCaprio याने गुलामांचा मालक Calvin J. Candie ही व्यक्तिरेखा साकारली आहे. Calvin हा अतिशय विक्षिप्त अन क्रूर स्वभावाचा आहे.गुलामांना आपसात लढवून मरेपर्यंत झुंझत ठेवून शेवटी जो जिंवत राहील तो विजयी. जिंकणाऱ्या गुलामाला पुन्हा विकत घेण्याची प्रथा. सांकेतिक शब्द Mandingo fights अशा गोष्टीत विकृत आनंद मिळवणारा कॅल्विन.त्याच्याकडे Django च्या बायकोचा Kerry Washington (Broomhilda) मालकी हक्क येतो.(गुलाम विकत घेण्याची प्रथा) या चित्रपटाचा पुढील प्रवास हा तीला सोडवण्यासाठीचा.
या चित्रपटात एक पात्र आहे.कॅल्विनचा एक “वफादार गुलाम” कम सेक्रेटरी (केअर टेकर) Samuel L. Jackson (Stephen) गंमत म्हणजे हा अश्वेत आहे. यापोस्टचा प्रपंच या “वफादार गुलामासाठी”
Racial Slurs
स्टीफन हा कॅल्विनच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व गुलामांवर करडी नजर ठेवणारा.शिवाय कॅल्विनचं कॅन्डीलँँड साम्राज्य सांभाळणारा.हा अतिशय डार्क शेड व्यक्तिरेखा रंगवताना दाखवला आहे.वंशवादाचे समर्थन आणि इतर रेसिस्ट संबोधल्या जाणाऱ्या शब्दांचा भडीमार त्याच्या तोंडी दाखवला आहे.क्विंटीन टेरंटिनोवर Racial Slurs वरून टीका झाली होती.रेसिस्ट शब्द टाळले गेले पाहिजेत अशासाठी.शेवटचा सीन स्टीफन आणि Django यांच्या मधिल संवाद हाईट आहे.चित्रपटात स्टीफनच्या तोंडी मदरxxx निग्गा ब्लॅॅकऍस इत्यादी अनेक शब्द सहजपणे येताना दिसतात.
[एक किस्सा घडलेला सेटवर – Leonardo DiCaprio अश्वेत गुलामांना सततच्या वापरण्यात येणाऱ्या शब्दांनी Racial Slurs वरून वैतागून शुटींग थांबवलं होतं.तेव्हा (स्टीफन) Samuel L. Jackson ने त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याला मानसिकआधार देण्यासाठी म्हटलं “Motherxxx, this is just another Tuesday for us” अर्थात हे अश्वेत लोकांसाठी नवं नव्हतं.आणि हे कलाकार वास्तविक जीवनात या विरोधात आहेत.Leonardo DiCaprio स्वत:ची याबाबत उघड भूमिका आहे.अन अर्थातच सम्युअलची देखिल.परंतु चित्रपटातील व्यक्तिरेखा हा वेगळा मुद्दा.]
This is just another Tuesday for us.
यातून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या गोष्टी केवळ ऐकताना सभ्य माणसाला त्रास होऊ शकतो. अशा गोष्टी असहनीय वाटू शकतात त्या गोष्टी इतरांच्या सोबत दररोज घडत असतात नव्हे,तर त्या त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या असतात.त्यामुळे सॅम्युल जॅकसन सहजपणे म्हणून जातो की this is just another Tuesday for us.
भारतात यापेक्षा वेगळं चित्र नाही.इथेही तपशील वेगळे असतील परंतु शोषण अत्याचार या घटना काही शोषित पीडित समाजासाठी नित्याची बाब असते.त्यांची आयुष्य यातच संघर्ष करत संपून जातात.
तर भारतात सुरु असलेल्या राजकीय सामाजिक घडामोडीत मला माझ्या आजूबाजूला असे स्टीफन दिसतात.ते राष्ट्रपती सुद्धा आहेत.ते खासदार आमदार सुद्धा आहेत.ते पत्रकार.डॉक्टर इंजिनिअर्स वकील अन फेसबुकयुजर्स देखिल आहेत.पाहिला नसेल तर एकदा हा चित्रपट पाहा.नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.स्टीफनशी जुळणारी व्यक्तिरेखा तुमच्या डोळ्यासमोर उभी राहताना दिसेल.वास्तव आयुष्यात Dr. King Schultz सारखे येत नसतात.गुलामीच्या गर्तेतून आपल्यालाच बाहेर पडायचं असतं.
आर्यन खान ला घेऊन जाणारा गुप्तहेर आणि भाजपाचा कार्यकर्ता?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)