कर्नाटक : कर्नाटकात एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचे दलित मुलावर प्रेम असल्याने तिचा गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की म्हैसूरमधील कांगगुरी गावातील 17 वर्षीय मुलगी पेरियापटना येथील महाविद्यालयात शिकत होती आणि सदर कुटुंब हे वोक्कलिगा समुदायातून असल्याची माहिती मिळत आहे.मृत तरुणीचे शेजारच्या गावात राहणाऱ्या एका दलित मुलावर प्रेम होते, मात्र कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते.
मृतदेहाची विल्हेवाट लावून वडील पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये
मुलीचे वडील सुरेश (45) आणि आई बेबी यांनी मुलीला त्या मुलाशी बोलण्यास मनाई केली होती, मात्र मुलीने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी मंगळवारी रात्री उशिरा तिचा गळा आवळून खून केला. ही घटना घडली त्यावेळी मुलीची आई तेथे उपस्थित होती. आणि प्रतिकार न करता केवळ पाहत होती.मुलगी बेशुद्ध पडल्यावर आईने मुलीच्या तोंडावर पाणी शिंपडले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
आई-वडिलांनी रात्रीच मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि वडिलांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सुरेश आणि त्याची पत्नी बेबीलाही अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुलीला आई-वडिलांसोबत राहायचे नव्हते
घटनेच्या सुमारे महिनाभरापूर्वी मुलीने तिच्या पालकांविरुद्ध पेरियापटना पोलिसांकडे तक्रारही केली होती, त्यानंतर पोलिसांनी तिला म्हैसूर येथील शासकीय बालिकागृहात पाठवले होते. मात्र पालकांनी दोन आठवड्यांनंतर समाजात आपली नाचक्की होईल,प्रतिष्ठा धुळीस मिळेल असे कारण देत मुलीला घरी आणले.घरी आणताना मुलीच्या वडिलांनी म्हैसूर जिल्हा बाल कल्याण समितीला (CWC) लेखी कळवले होते की ते मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा नुकसान करणार नाहीत.
म्हैसूर जिल्हा बाल कल्याण समितीचे म्हणणे आहे की मुलगी आधीच तिच्या पालकांसोबत जाण्यास नकार देत होती, परंतु तिच्या पालकांनी समजूत घालून मन वळवल्यानंतर ती त्यांच्यासोबत गेली. अधिकाऱ्यांनी तपास अहवाल सादर केल्यानंतरच मुलीला घरी जाण्यास परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दलित मुलावर प्रेम केल्याने पोटच्या मुलीच्या हत्या करून,समाजातील प्रतिष्ठा सन्मान बद्दल बोलणाऱ्या आई वडिलांनी कोणती प्रतिष्ठा सन्मान मिळवला?
हा प्रश्न प्रत्येकाने विचार करून त्यावर उत्तर शोधलं पाहिजे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
औरंगाबाद मध्ये बसमध्ये बॉम्ब ची अफवा; प्रवाशांमध्ये खळबळ
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
RRR Box office collection पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 09 2022 15 : 00 PM
WebTitle – Dalit Atrocities Love with Dalit boy ; Father killed daughter