जाती वरून शिव्या आणि त्याचे सामाजीकरण… प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो.तो असायलाही पाहिजेत, असाचं प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. प्रत्येक जातीला त्याचा इतिहास आहे. प्रत्येक जातीचे वेगळेपण आहे, महत्त्व आहे. आधीच्या काळात जेव्हा जाती अस्तित्वात नव्हत्या तेव्हा फक्त धर्म अस्तित्वात होता. जेव्हा मनुष्य स्थिरावून व्यवसाय करायला लागला तेव्हा आणि त्यानंतर माणसाच्या व्यवसायावरून जाती अस्तित्वात आल्या. आनंद निलकंठन यांच्या ‘ असुर ‘ कादंबरीचा संदर्भ देऊन सांगायचे झाले तर रावणाच्या पराभवानंतर रामाच्या सांगण्यावरून विभिषणाने व्यवसायावरून जाती पाडल्या, असे वाचण्यात येईल.
वर्णव्यवस्थेवरून सर्वांना हीन वागणूक देण्यात येत होती
वर्णव्यवस्थे वरून शूद्र या वर्णांमध्ये जे ही लोक येत, त्या सर्वांना हीन वागणूक देण्यात येत होती. आता परिस्थिती बदलली आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान दर्जा देण्यात आला आहे तरीही, आधी ज्यांना हीन, खालच्या दर्जाचे समजले जात होते त्या लोकांना त्यांच्या जाती वरुन शिव्या देण्यात येतात, असे प्रकार सातत्याने घडतात आणि आपल्या समाजाने त्याला स्विकृती ही दिली आहे. अशा जातीवाचक शिव्या हेतूपरस्पर, अनावधानाने, मस्करी ने देण्यात आल्या तरी असं करणे कायद्याने गुन्हा आहे. कुठल्याही उद्देशाने जातीवाचक शिव्या दिल्या तरी त्या जातीचा आपण अपमान करत आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजेत.
जाती ला एखादा शब्द जोडून अपभ्रंश करून शिव्या दिल्या जातात
अनुसूचित जाती जमाती मध्ये समाविष्ट असलेल्या विविध जाती,त्या जातीला एखादा शब्द जोडून त्याचा अपभ्रंश करून कश्या शिव्या दिल्या जातात हे आपण पाहुयात.
‘ चांभार ‘ या जातीच्या नावावरून ‘ चांभारा ‘ ही शिव प्रचलित आहे. जो व्यक्ती जास्त बोलतो, चाड्या लावतो, याची गोष्ट त्याला आणि त्याची गोष्ट याला सांगतो अशा व्यक्तीला ‘ वारका ‘ ही शिव सर्रास देण्यात येते. वारीक म्हणजेच न्हावी. जे केस कापतात त्याला न्हावी म्हणतात. ग्रामीण भागात त्यांना वारीक म्हणतात. त्यांच्या जातीवरुन/व्यवसायावरून ही शिव प्रचलित आहे. ‘ मादर ‘ या जातीला ‘ चोद ‘ हा शब्द जोडून ‘ मादरचोद ‘ ही शिवी देण्यात येते. या शिवी मध्ये आपण एका जातीचा अपमान करत असतो, ही गोष्ट लक्षात न येणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. एखादी स्त्री वारंवार एखादी गोष्ट बदलत असेल तर तिला ‘ चलवादी ‘ असे म्हणतात. चलवादी ही वारंवार देण्यात येणारी शिव आहे. ही शिवी खास करून महिलांसाठी वापरण्यात येते.
डक्कल/डोक्कलवार या शब्दाला प्रत्यय जोडून किंवा अपभ्रंश करून ‘ डक्कलवार ‘, ‘ डक्कलवारा ‘ ही शिवी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. एखादा व्यक्ती गावभर हिंडत असेल तर तो व्यक्ती ढोर आहे, असे म्हणतात. ढोर म्हणजे जनावर. पण अनुसूचित जातीमधील १८ वी जात ढोर आहे. ग्रामीण भागात ढोरा ही शिवी वापरण्यात येते. ‘ कैकाडी ‘ समाजाचा मुख्य व्यवसाय वराहपालन किंवा डुक्कर पालन आहे पण याच कैकाडी समाजासाठी डुकरा ही शिव वापरली जाते. ‘ खाटीक ‘ जातीवरून ‘ खाटका ‘ ही शिवी देण्यात येते. एखादी व्यक्ती खालच्या जातीचा असेल तर त्याला सर्रास ‘ धेड, धेडा ‘ असे म्हणतात. पण ही शिवी देताना ‘ धेड ‘ ही एक जात आहे व त्या जातीचा अपमान होतो, हे आपण विसरतो.
काही म्हणी मधूनही एखादी जात-जमात खालच्या दर्जाची आहे हे दर्शविले जाते.
‘ मांग किंवा मातंग ‘ समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या जातीवरुनही शिव्या प्रचलित आहेत.
जो व्यक्ती उसनवारी जास्त करतो, कुठलीही वस्तू लोकांना मागत राहतो त्यासाठी ‘ भीकमांग्या ‘ ही शिवी वापरण्यात येते.
तसेच मातंग समाज कलावंतांचा समाज आहे. तरी ही एखाद्याला शिवी द्यायची असेल तर त्याला ‘ डफड्या ‘ म्हणतात.
एखाद्याला ‘ डफड्या ‘बोलून आपण मातंग समाजाचा अपमान करत असतो, हे आपल्याला कळायला पाहिजेत.
‘ महार ‘ समाजासाठी ‘ महाऱ्या ‘ ही शिवी तर प्रचलित आहे.
एखादी व्यक्ती घाण किंवा निकृष्ट काम करत असेल तर त्याला ‘ भंगी ‘ ही शिवी देण्यात येते
पण याचं शिवीमुळे भंगी समाजाचा अपमान होतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत.
काही म्हणी मधूनही एखादी जात-जमात खालच्या दर्जाची आहे हे दर्शविले जाते.
‘ कुठे राजा भोज, कुठे गंगू तेली ‘ या म्हणीतून ‘ तेली ‘ समाज खालच्या दर्जाचा आहे,असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
शिव्यांची निर्मिती कधी झाली हे सांगता येणार नाही पण एखाद्याचा अपमान करण्यासाठी, त्याला कमीपणा दाखविण्यासाठी,
एखाद्या व्यक्तीवर राग काढण्यासाठी आपण शिव्या देत असतो.
पण काही जातीवाचक शिव्या मुळे त्या त्या जातीचा अपमान होतो की गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजेत.
‘ॲट्रॉसिटी’ कायद्यात जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा
‘ॲट्रॉसिटी’ कायद्यात जातीवाचक शिव्या देणे हा जरी गुन्हा असला तरी
असल्या शिव्या ग्रामीण भागात रोजच्या वापरात येतात आणि लोकसुद्धा त्याला ‘ यांत काही वावगं नाही ‘ असंच घेतात.
लोकांनी या शिव्यांचे सामाजीकरण करून त्याला आपल्या अंगवळणी पाडलं आहे.
जातीच्या शिव्या आणि त्या शिव्यांचे झालेले सामाजीकरण, ही मोठी शोकांतिका आहे.
पण शिव्या देण्यात कसला आलाय गुन्हा, असाच लोकांचा दृष्टिकोन आहे.
त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी हा दृष्टिकोन बदलणे समाजाची खरी गरज आहे.
जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना..आत्मशोध घेताना..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 07, 2021 15 :21 PM
WebTitle – Cursing from caste and its socialization