“कोरोना विषाणू जगण्यासाठी धडपडत आहे,आपण त्याच्या मागे लागलो आहोत.”
त्रिवेंद्र सिंह रावत
उत्तराखंड दि.14 – एकीकडे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग असताना यादरम्यान गंगेच्या किनारी अनेक कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला,तसेच उत्तराखंड येथे यावेळचा कुंभ मेळा आयोजित केल्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट झाला.कुंभमेळ्यात(Haridwar Mahakumbh)फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क (Mask) आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले होते.इथे झालेल्या प्रचंड गर्दीदरम्यान थर्मल स्क्रीनिंग आणि इतर उपाययोजना करण्यात राज्य सरकारही अपयशी ठरलं आहे.”कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार” माजी मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे
यामुळे स्वाभाविकपणे जे होणार होते ते आता समोर येवू लागले आहे.
कुंभमेळ्यानंतर कोरोना रुग्ण संख्या तब्बल 1800 टक्क्यांनी वाढली असल्याचे समोर आले आहे.
अनेक साधू संत करोना बाधित झाले आहेत.
अशातच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचेही कोरोनाने निधन देहराडूनमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.
या पार्श्वभूमीवर नेहमीच अजब गजब व्यक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य करण्यात आले.
भाजपचे बरेचसे नेते हे असे अवैज्ञानिक अतार्किक मुद्यांवर बोलण्यास आघाडीवर असतात.
कोरोनासुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे
अशातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात एक अजबगजब वक्तव्य केलं.कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये हाहाकार माजलेला असतानाच त्रिवेंद्र सिंह यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन आता जोरदार राजकीय टीकाही सुरु झाली आहे.त्रिवेंद्र सिंह यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोनासुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर त्रिवेंद्र सिंह यांचं हे वक्तव्य सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झालं आहे.
अशा लोकांमुळेच आपल्या देशाला आज करोना संकटाचा सामना करावा लागत असल्याचा टोला
म्युटेड करोना विषाणूसंदर्भात बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी करोना हा सुद्धा विषाणू असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.
“तसं पाहिलं तर करोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे.
मात्र आपण (मनुष्य) स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत.
मात्र त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय,” असं त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
यावरुन काँग्रेससहीत विरोधी पक्षांनी त्रिवेंद्र सिंह यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसच्या डिजिटल टीममधील सदस्य आणि नेते असणाऱ्या गौरव पांधी यांनी अशा लोकांमुळेच आपल्या देशाला आज करोना संकटाचा सामना करावा लागत असल्याचा टोला लगावला आहे.
पांधी यांनी त्रिवेंद्र सिंह यांचा व्हिडीओही शेअर केलाय.
करोना विषाणूपासून वाचण्यासाठी काय करावं लागेल यासंदर्भातही त्रिवेंद्र सिंह यांनी भाष्य केलं आहे. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या विषाणूच्या पुढे जावं लागणार आहे, असं त्रिवेंद्र सिंह मानले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एकाने, “या जीवाला सेंट्रल व्हिस्टामध्ये आश्रय देण्यात यावा” असा टोला लगावला आहे. तर राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी, “करोना एक प्राणी आहे असं माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते त्रिवेंद्र सिंह म्हणत आहेत. या विचारसरणीनुसार त्याला आधारकार्ड किंवा रेशन कार्डही द्यायला हवं,” असा उपरोधिक टोला लगावला आहे.
गुजरात मध्ये 71 दिवसात 1.25 लाख लोकांचा मृत्यू
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 14 , 2021 17: 00 PM
WebTitle – Corona virus also a live being and he is also have right to live says BJP former chief minister 2021-05-14