आपला देश सध्या कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त आहे. रस्त्यावर मृत्यू चे तांडव सुरू असून मृत्यू ओंगळ आहे. अशी काही कुटुंबे आहेत जिथे शेवटचे अत्यसंस्कार करायला गेले त्यांना सुध्दा कोरोना होऊन ते अख्खे कुटुंबांचे अंत झाले आहे.आता प्रश्न असा आहे की भारत कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त असून सुद्धा भारतात काळाबाजार चालू आहे, हे कोरोनापेक्षा जास्त वेदनादायी आहे.
भारतात अनेक वर्षापासून काही लोक मृताच्या टाळूवरचे लोणी खाऊन आपल्या तिजोऱ्या तुबंड्या भरत आहेत. ही सगळी गिधाडासारखी आहेत की गिधाडे मृत प्राण्याचे शरीर खातात, काही लोभी लोक जिवंत मनुष्याला मृतदेह बनवत आहेत. जगभरात कोरोना साथीच्या साथीसाठी डॉक्टर दिवसरात्र संघर्ष करत आहेत. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित हजारो लोकांनी इतरांची सेवा करताना आपला जीव गमावला.
अनेक व्यापाऱ्यानी शेकडो सिलिंडर ऑक्सिजन ब्लॅकमध्ये विकले
अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशभरात अनेक लोक मृत्युमुखी पडले तर दुसरीकडे कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त असून सुद्धा भारतात काळाबाजार चालू आहे.अनेक व्यापाऱ्यानी शेकडो सिलिंडर ऑक्सिजन ब्लॅकमध्ये विकले आणि ते सरकार आणि जनतेच्या नजरेतून लपवून ठेवले.आणि हे सगळं संपुर्ण देशात सुरू आहे प्रामुख्याने हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यासारख्या प्रदेशा मध्येही लोक आँक्सीजन अभावी मृत्यू पावत आहेत.
देशात केवळ ऑक्सिजनच नाही तर जीव वाचवणार्या औषधांचा काळा व्यापार जोरात चालू लागला.
रेमेडिसिव्हिरला तीन ते पाच हजार रुपयांचे इंजेक्शन पन्नास हजारांपासून एक लाखात विकले गेले.
देशात बनावट उपाय करण्याचा व्यवसायही सुरू आहे.
काळे धंदे लपविण्यासाठी शेकडो इंजेक्शन्स फेकून देण्यात आली आहे हे कदाचित कायद्या पासून बचाव करण्यासाठी.
पण आतापर्यंत याचा निर्णय झालेला नाही, तो बनावट आहे की खरा.
दुर्दैवाने, हाच भ्रष्टाचार निर्मूलन करण्याची घोषणा करून पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यावर केली,
मी हे खाणार नाही, खाऊ देणार नाही,अशी घोषणा केली.परंतु आज असे दिसते आहे की
या बेकायदेशीर व्यावसायिकां पाठबळ असल्याशिवाय हे करु शकत नाही.
रुग्णवाहिकेसाठी एक लाख वीस हजार रुपये आकारले जातात
अगदी थोड्या अंतरावर असून सुद्धा रुग्णांना आणण्यासाठी या रुग्णवाहिकेसाठी एक लाख वीस हजार रुपये आकारले जातात यापेक्षा आणखी काय लाजिरवाणे असू शकते.
फक्त एकच नाही,अशा अनेक घटना घडतात जिथे एक हजारांचे काम असेल तिथे दहा हजारांवर रूपये घेण्यात येत आहे.
दिल्ली आणि गुजरातमधील काही व्यापारी ऑक्सिजन काळाबाजार करतांनी पकडले गेले आहेत. असे असले पाहिजे की या लोकांना केवळ काळ्या बाजारासाठी शिक्षा होऊ नये तर जे प्राणवायूविना मृत्यूला गेले आहेत त्यांना ठार मारले म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कायद्यात कोणती दुरुस्ती आवश्यक आहे ते करुन , अशा लोकांना आजीवन कारागृहात ठेवले पाहिजे, तरच आँक्सीजन अभावी मृतदेह बनलेल्या आणि ज्यांची कुटुंबे उरली आहेत त्यांनाच काही न्याय दिला जाऊ शकतो.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. भांवडलशाही आणि आर्थिक विषमता
वाचा..भूक व शेतकरी यांचा जागतिक संघर्ष
हे ही वाचा..महिला शेतकरी व शेतकरी आंदोलन
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 13, 2021 12:10 PM
WebTitle – Corona and black market vultures 2021-05-13