मुंबई/29-07-2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पुढील वर्षी अपेक्षित आहेत. अशातच राज्यात राष्ट्रवादीतून फुटून एक गट भाजपला जाऊन मिळाला आहे.त्यामुळे राज्यातील समीकरणे बदलताना दिसतात.या पार्श्वभूमीवर इतर पक्षही युतीचा विचार करत आहेत. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी जागल्याभारत ला दिलेल्या माहितीनुसार,वंचित बहुजन आघाडी आणि BRS या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी तेलंगणा आणि महाराष्ट्रात संभाव्य युतीसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच BRS कडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
कुठलीही राजकीय चर्चा नव्हती
तेलंगणा सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
त्यावेळी बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमास उपस्थित होते.
मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल
KCR यांच्या नेतृत्वाखालील BRS सरकारने राज्यातील प्रत्येक क्षेत्रात SC, ST, BC आणि अल्पसंख्याकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. संभाव्य राजकीय युतीसाठी BRS ने पुढाकार घेतल्यास, वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल; BRS चा मताचा वाटा, लोकप्रियता आणि VBA च्या सामाजिक अजेंडाला चालना देण्यासाठी BRS काय करू शकते यासारखे अनेक घटक युती संदर्भात निर्णायक ठरतील. तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे पण BRS हा VBA साठी महाराष्ट्रात किती उपयुक्त सहयोगी असू शकतो हा ही आमच्यासमोर प्रश्न आहे. मात्र BRS कडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास नक्कीच वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल.असं प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रकाश आंबडेकर मविआ मध्ये सामील होणार? उद्धव ठाकरे म्हणाले..
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 29,2023 | 22:04 PM
WebTitle – Contemplation of alliance from Vanchit bahujan aghadi if there is a proposal from BRS