मुंबई | 27 जुलै 2023 : देशात बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप विरुद्ध INDIA ची आघाडी स्थापन केलीय,(यात आंबेडकरी म्हणून असणारे दोन पक्ष मात्र या आघाडीने विचारत घेतले नव्हते,याबाबत जागल्याभारत ने मागेही स्टोरी केली होती,आज शिवसेना नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘आवाज कुणाचा’ या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.दरम्यान,राऊत यांनी महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित आघाडीच्या मविआ मध्ये सामील होण्याच्या एकत्रित येण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भाष्य केलंय.
महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित आघाडीच्या मविआ मध्ये सामील होण्याच्या
एकत्रित येण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भाष्य केलंय.संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की ,
“मधल्याकाळामध्ये महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होतील,
किंवा त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचा संपूर्ण आंबेडकरी समाज असं एक वातावरण आपण निर्माण केलं होतं, ते का थांबलं?,
असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
मला खात्री आहे,ते आमच्यासोबतच असतील
यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलं की,असं वातावरण केलं होतं नाही, तर ते अजूनही तसेच आहे.प्रकाशजी आणि माझी आता नजिकच्या काळात प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी मधल्या काळात राष्ट्रवादीच्या घडामोडी झाल्या.राष्ट्रवादीचा एक गट फुटला, त्याच्या अगोदर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरु होत्या. मग नुकतंच इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. यात आमच्यामध्ये प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही,बोलणी झाली नाही.असं उद्धव ठाकरे म्हणाले
“मात्र मी त्यांना विनंती केली आहे की,तुमच्या मनात नेमकं काय आहे ? एक काहीतरी प्रस्ताव असेल तर आम्हाला साधारण अंदाज येऊ द्यात,तसा प्रस्ताव तुम्ही दिल्यानंतर मी या सगळ्यांशी बोलून त्यांचा प्रस्ताव काय,आपण काय करू शकतो असं करून एकत्रितपणाने जर सगळे देशभर पक्ष एकत्र येत आहेत तर साहजिकच आहे प्रकाशजी प्रस्ताव तयार करून देतील,त्यावर चर्चा होईल,आणि मला खात्री आहे, ते आमच्यासोबतच असतील,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनणार की नाही या चर्चेला एक स्पष्ट संकेत दिला आहे.
जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर वंचित बहुजन आघाडी सोबत महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळून भाजप आणि त्यांच्यासोबत पक्ष फोडून गेलेल्या इतर गटांचे निवडून येणे नक्कीच अवघड होणार आहे.
या मुद्यावर शिवसेना व वंचित बहुजन आघाडी युती झाली
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 27,2023 | 15:26 PM
WebTitle – Prakash Ambedkar to join mahavikas aghadi Uddhav Thackeray cleared