Salman Khurshid house attacked: काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला करण्यात आला आहे. सलमान खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी राकेश कपिलसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान खुर्शीद यांनी अलिकडचे प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकात ‘‘सनराइज ओवर अयोध्या: नेशनहुड इन आवर टाइम्स’’
या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना बोको हराम, आयसिससोबत केली होती.त्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात टीका केली होती.
काही लोकांच्या हातात भाजपचे झेंडे
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून जाळपोळ झालेल्या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले. सलमान खुर्शीद यांच्या घराच्या खिडक्या आणि दारांची प्रचंड तोडफोड करताना त्यांना आग लावण्यात आल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पुतळे जाळणाऱ्या काही लोकांच्या हातात भाजपचे झेंडे आहेत आणि ते धार्मिक घोषणा देत आहेत.
ही छायाचित्रे शेअर करताना सलमान खुर्शीद म्हणाले की, ज्यांनी हे कॉलिंग कार्ड सोडले आहे त्या मित्रांसाठी मी हे दार उघडेल अशी मला अपेक्षा होती, असे खुर्शीद म्हणाले की, हे हिंदुत्व होऊ शकत नाही असे म्हणण्यात मी अजूनही चूक आहे का? यासोबतच सलमान खुर्शीद म्हणाले की, आता अशी चर्चा सुरू आहे की, लाज हा अत्यंत कुचकामी शब्द ठरला आहे. तरीही, मला आशा आहे की एक दिवस आपण एकत्र तर्क करू शकू आणि सहमत नसतानाही सहमत होऊ.
सलमान खुर्शीद यांनी पुस्तकावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की,
ही मंडळी धर्माला विकृत करण्यामध्ये एकसारखे आहेत. हिंदूत्वाने सनातन धर्म
आणि हिंदू धर्मातील मूल्यांसोबत फारकत घेतली असून बोको हराम आणि अशाच दुसऱ्या संघटनांप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशा लोकांचे हिंदू धर्माशी काहीही घेणेदेणे नाही. अशा लोकांच्या हिंदुत्वामुळे धर्म विकृत होत असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले होते.
एनसीबीची मोठी कारवाई नांदेड मध्ये 1127 किलो गांजा जप्त
गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव, एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15, 2021 21:15 PM
WebTitle – Congress leader Salman Khurshid’s house attacked, set on fire