बोगोटा, कोलंबिया – या वर्षाची सर्वात सुंदर दिलासादायक बातमी,अॅमेझॉन जंगलात एका विमान अपघात झाला यात आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या 4 स्थानिक लहान मुलांना 40 दिवसांनी शोधण्यात यश आले,ही चारही मुलं जिवंत होती,Columbia plane crash, 4 children found alive in jungle 40 days later याबद्दल देशात अन इंटरनेटवर बातमी आल्यानंतर जगात देखील आश्चर्य व्यक्त केले जात असून सोशल मिडियात ही बातमी व्हायरल होत आहे. कोलंबियाच्या अधिका-यांनी जाहीर केले की राष्ट्राला काळजीत टाकलेल्या या गहन प्रश्नाचा शोध संपवला आहे.
अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी क्युबाहून बोगोटा येथे परतल्यावर पत्रकारांना सांगितले की जेव्हा शोधकर्त्यांना ही मुलं सापडली तेव्हा मुले एकटी होती,आता त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत,
राष्ट्रपती म्हणाले की ही मुलं हे “जगण्याचे उदाहरण” आहेत त्यांची गोष्ट “इतिहासात अमर राहील” .
हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य
इतके दिवस ही लहानगी मुलं स्वतःहून कशी जगू शकली याबद्दल कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
मात्र या जंगलात विषारी साप,कोळी,पॅंथर आणि चित्ता अशा वाघांचे मोठ्याप्रमाणात वास्तव्य असल्याचे कळते.
हा अपघात 1 मे च्या पहाटे घडला, जेव्हा सेसना सिंगल-इंजिन प्रोपेलर विमानात Cessna single-engine propeller plane
एकूण सहा प्रवासी आणि पायलट असे सातजण प्रवास करत होते.विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमरजन्सी लॅंडींग करण्याच्या प्रयत्नात विमान अपघातग्रस्त झालं होतं.
लहान आकाराचं हे विमान थोड्याच वेळात रडारच्या संपर्कातून दूर झाले.अपघातानंतर दोन आठवड्यांनंतर, 16 मे रोजी, कोलंबिया च्या एका शोध पथकाला रेनफॉरेस्टच्या घनदाट भागात हे अपघात झालेले विमान सापडले. त्यातील तीन प्रौढांचे मृतदेह बाहेर काढले गेले, परंतु विमानातून प्रवास करणारी इतर लहान मुले वय अनुक्रमे 13, 9, 4 आणि 11 महिने ही कुठेही सापडली नाहीत.ते जिवंत असल्याचा समज करून, त्याच आशेवर कोलंबियाच्या सैन्याने मुलांचा शोध सुरू केला सर्च ऑपरेशन सुरू झालं.
13, 9, 4 आणि 11 महिने वयोगटातील या चार भावंडांचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांसह 150 सैनिकांना या भागात पाठवले गेले.
स्थानिक आदिवासींच्या डझनभर स्वयंसेवकांनीही शोधकार्यात मदत केली.
दाट धुके आणि घनदाट झाडांची पानं यामुळे व्हिजिबिलिटी कमी
बचाव पथकाने शुक्रवारी थर्मल ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या मुलांसोबत काही छायाचित्रे ट्विट केली.
एका सैनिकाने लहान मुलाच्या ओठावर बाटली धरली.हवाई दलाने नंतर ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ट्विटमध्ये असे म्हटले आहे की विमान सॅन जोस डेल ग्वाविअर शहराकडे जात होते, परंतु अधिक तपशील दिलेला नाही.
कोलंबियाच्या लष्करी कमांडने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले, “आमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
शोधादरम्यान, दाट धुके आणि घनदाट झाडांची पानं यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात मर्यादित असलेल्या भागात,
हेलिकॉप्टरवरील सैनिकांनी अन्नाचे पाकीटं जंगलात टाकली, या आशेने की ते मुलांना टिकवून ठेवण्यास मदत करेल.
रात्रीच्या वेळी जमिनीवर शोध करणार्यांना मदत करण्यासाठी जंगलावरून उडणाऱ्या विमानातून सांकेतिक आतिषबाजी fired flares करण्यात आली
जमिनीवरील बचावकर्त्यांनी मेगाफोनचा वापर केला,या मेगाफोन मध्ये या भावंडांच्या आजीने रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवला जात होता,आणि त्यांना एकाच ठिकाणी राहण्यास सांगितले जात होते.
मुलांच्या अस्तित्वाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या.इतकच नाहीतर 18 मे रोजी राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी ट्विट केले की मुले सापडली आहेत.
मात्र,त्यानंतर सरकारी एजन्सीने आपल्याला चुकीची माहिती दिल्याचा दावा करत त्यांनी ते ट्विट डिलिट केलं होतं.
या चार मुलांसोबत त्यांची आई आणि विमानाचे दोन पायलट असे एकूण सात लोक अराराकुआरा या अॅमेझोनियन गावातून सॅन जोसे डेल ग्वाविअरे Araracuara to San Jose del Guaviare या अॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या काठावरील लहान शहरापर्यंत प्रवास करत होते.
मुलाला रेनफॉरेस्टमध्ये कसे जगायचे याचे ज्ञान होते
ते Huitoto जमातीचे सदस्य असल्याचे कळते,अधिकार्यांनी सांगितले की या मुलांमधील सर्वात मोठ्या मुलाला रेनफॉरेस्टमध्ये कसे जगायचे याचे ज्ञान होते.
शुक्रवारी, मुलांची सुटका झाल्याची पुष्टी केल्यानंतर, अध्यक्ष म्हणाले की काही काळासाठी त्यांचा असा विश्वास होता की मुलांना जंगलातील आदिवासी जमातींपैकी कुणीतरी वाचवलं असावं जे अजूनही जंगलाच्या अतीदुर्गम भागात वास्तव्य करत आहेत.पण पेट्रो यांच्या म्हणण्यानुसार,सैनिकांनी जंगलात नेलेल्या बचाव कुत्र्यांपैकी एकाने ही मुले प्रथम शोधली.
मुले सापडली तेव्हा अपघातस्थळापासून ते किती दूर होते हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. परंतु ज्या ठिकाणी हे विमान अपघातग्रस्त झालं
त्या ठिकाणापासून शोध पथक 4.5 किलोमीटर (जवळपास 3-मैल) त्रिज्येत शोध घेत होते.
शोध जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे सैनिकांना जंगलात लहान-लहान संकेत सापडत गेले.
ज्यामुळे त्यांना असा विश्वास वाटला की मुले अजूनही जिवंत आहेत, ज्यात पायाचे ठसे, बाळाची बाटली, डायपर आणि काही अर्धवट खाल्लेली फळे यांचा समावेश आहे.
“जंगलाने त्यांना वाचवले” असं राष्ट्राध्यक्ष पेट्रो म्हणाले. “ती जंगलाची मुले आहेत आणि आता ते कोलंबियाचीही मुले आहेत.”
व्लाद दी इम्पेलर : पराकोटीचा द्वेष करणारा शासक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 10, JUN 2023, 17:18 PM
WebTitle – Columbia plane crash, 4 children found alive in jungle 40 days later