चेर्नोबिल अणुभट्टी दुर्घटना (Chernobyl Nuclear Power Plant) ही जगातील सर्वात मोठी आणि भयानक दुर्घटना म्हणून पाहिली जाते.रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध (war between russia and ukraine) सुरु झाल्यानंतर रशियाने ही अणुभट्टी आपल्या ताब्यात घेतली आहे.काही तासांपूर्वी (२४-०२-२०२२) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना जी भीती वाटत होती ती आता प्रत्यक्षात आली आहे.झेलेन्स्की यांना भीती वाटत होती की रशियन सैन्य चेर्नोबिल अणु प्रकल्प काबीज करेल. आणि ते आता प्रत्यक्षात घडलंय. 1986 सारखी दुर्घटना घडू नये म्हणून आमचे सैनिक जीवावर खेळून हा परिसर वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले होते. राष्ट्रपतींनी स्वीडनच्या प्रधानमंत्र्यांनाही याबाबत माहिती दिली होती. तसेच इथं रशियाने ताबा मिळवणे म्हणजे संपूर्ण युरोपाविरुद्ध युद्धाची घोषणा करण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं.
चेर्नोबिल अणुभट्टी दुर्घटना केव्हा घडली?
२६ एप्रिल १९८६ रोजी रात्री Pripyat प्रिपयात शहरातील चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. २६ एप्रिल १९८६ रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामधील (आजच्या घडिला युक्रेनमधील) चेर्नोबिल आण्विक अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक आण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या आण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.
दुर्घटना घडली तेव्हा कुणाच्या लक्षात आलं नाही की एवढा मोठा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे Pripyat शहर त्वरित रिकामे करण्यात आले नाही. स्थानिक वेळेनुसार रात्री 01:23 वाजता,हा स्फोट झाला. जे घडले त्याबद्दल स्थानिक नागरिकांना काहीही कल्पना नव्हती.मात्र, स्फोटानंतर काही तासांतच अनेक लोक आजारी पडले. नंतर, त्यांनी खोकला आणि उलट्या तसेच अनियंत्रित फिट्ससह गंभीर डोकेदुखी आणि तोंडात विशिष्ट धातूची चव नोंदवली गेली.
न्यूक्लियर प्लांट अणु गळती अपघातानंतर रेडिएशनचा प्रभाव 2600 स्क्वेअर किलोमीटरपर्यंत होता. पुढील २४ हजार वर्षे या ठिकाणी कोणीही मनुष्य राहू शकणार नाही, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. आता हा परिसर आण्विक कचरा साठवण्याचं केंद्र बनलं आहे. अनेक टन अणुइंधन इथं ठेवलं जातं. गेल्या वर्षी एक अहवाल आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की या प्लांटमध्ये अजूनही इंधन धुमसत आहे. ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो.
Pripyat प्रिपयात शहर बनलं Ghost Town
1986 मध्ये हे शहर घाईघाईने रिकामं करण्यात आल्यापासून शाळा आणि रुग्णालये अस्पर्शित राहिली आहेत. 2011 च्या टेलीग्राफच्या अहवालात असं म्हटलंय की : “शेकडो टाकून दिलेले गॅस मास्क शाळेच्या कॅन्टीनच्या मजल्यावर दिसून येतात, लहान मुलांच्या बाहुल्या विखुरलेल्या आहेत, “
अशा बर्याच बाहुल्या तिथल्या उध्वस्त झालेल्या शाळेत कलात्मकरीत्या मांडण्यात आल्या आहेत.धुळीने माखलेल्या, डोक्याखाली उशा किंवा गॅस मास्क लावलेल्या असतात. येथे राहणाऱ्या मुलांना श्रद्धांजली म्हणून किंवा घटनेची तीव्रता आणि गांभीर्य जाणवून देण्यासाठी कदाचित ठेवलेल्या आहेत.
सरकारने या अपघाताची घटना गुप्त ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला,
परंतु इतर देशांना काहीतरी बंद असल्याचे लक्षात येण्यास वेळ लागला नाही.
साधारणपणे पॉवर प्लांट्स मधिल सामान्य किरणोत्सर्गाचा पातळी 1,000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरुन देखील मोजता येते.
परंतु तपासणीनंतर, त्यांना कळले की स्त्रोत इतरत्र आहे.
ज्वालामुखीतील लावाप्रमाणे स्फोट होण्याची भीती
याव्यतिरिक्त, Pripyat मधील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागला,त्यांना सांगण्यात आले की ते लवकरच घरी परत येऊ शकतील.मात्र त्यांना त्यानंतर पुन्हा कधीही आपलं घर पाहायला मिळालं नाही.नागरिक पुन्हा घरी परतू शकले नाहीत आणि संपूर्ण शहर निर्जन राहिलं.
रशिया आणि युक्रेनच्या मीडियामधील वृत्तानुसार, चेरनोबिल आण्विक संयंत्राच्या तळघरात खोली क्रमांक 305/2 पर्यंत पोहोचणे कठीण आहे. काही संशोधकांनी हिंमत एकवटून त्याच्या जवळपास पोहोचण्यास यशस्वी प्रयत्न केला.तेथे त्यांना न्यूट्रॉनचे प्रमाण वाढलेले आढळले. खोली क्रमांक 305/2 मध्ये मोठ्या प्रमाणात दगड पडलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याच्या आत किरणोत्सर्गी युरेनियम, झिरकोनियम, ग्रेफाइट आणि वाळू भरलेले आहे.
जर खोली क्रमांक 305/2 मधील रेडिओ एक्टिव्हीटीने रौद्र रूप धारण केलं तर ज्वालामुखीतील लावाप्रमाणे स्फोट होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या खोलीत ठेवण्यात आलेले अणु सामग्री लाव्हाप्रमाणे स्फोट होण्यासाठी फ्यूल कंटेनिंग मटेरियल (FCM) मध्ये बदलले जाईल. जर एखाद्या ठिकाणी न्यूट्रॉनचे प्रमाण वाढले तर असे मानले जाते कीफ्यूल कंटेनिंग मटेरियल FCM मध्ये विखंडन प्रतिक्रिया होत आहे. म्हणजेच न्यूट्रॉनचे प्रमाण वाढते, तेव्हा युरेनियमचे केंद्रक तुटत आहे. यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
मुक्या प्राण्यांवर परिणाम
सध्या चेरनोबिलजवळ काही लोक राहतात, अपघाताच्या परिसरात राहणाऱ्या प्राप्राण्यांवर रेडिएशनच्या परिणामांचा अभ्यास आणि आपत्तीतून बचाव झालेल्या प्राण्यांची पुनर्प्राप्ती स्थिती मोजण्याचे संशोधन करण्यात येत आहे.बहुतेक पाळीव प्राणी अपघातापासून दूर नेले गेले ,मात्र जे या अपघाताच्या तडाख्यात सापडले ते प्राणी जन्माला आले परंतु ते पुनरुत्पादित झाले नाहीत. अपघातानंतरच्या पहिल्या काही वर्षानंतर, चेर्नोबिलच्या प्रभावाबद्दल जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी मागे राहिलेल्या वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे.
चेर्नोबिल दुर्घटनेची तुलना अणुबॉम्बच्या परिणामांशी केली जाऊ शकत नाही कारण अणुभट्टीद्वारे सोडले जाणारे
समस्थानिक हे अण्वस्त्राद्वारे तयार केलेल्या समस्थानिकांपेक्षा वेगळे असले तरी अपघात
आणि बॉम्ब या दोन्हीमुळे उत्परिवर्तन (म्युटेशन) आणि कर्करोग होतो.
लोकांना आण्विक उत्सर्जनाचे गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम समजून घेण्यासाठी यात मदत होण्यासाठी अशा आपत्तीच्या परिणामांचा या पातळीवर अभ्यास करणे महत्वाचे आहे. शिवाय, चेर्नोबिलचे परिणाम समजून घेतल्याने इतर अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाल्यात त्याची काळजी घेण्यासाठी काय काय पूर्वतयारी आणि सेफ्टी मेजर्स असावेत याचाही कल्पना अशा अभ्यासातून येते.
जर रशियन क्षेपणास्त्रे किंवा तोफगोळे चेर्नोबिल अणुप्रकल्पावर पडले, तर पुन्हा 1986 सारखी दुर्घटना घडू शकते.
यूकेमधील शेफिल्ड विद्यापीठातील अणुतज्ज्ञ नील हयात यांनी सांगितले की,
चेर्नोबिलच्या खोली क्रमांक 305/2 मधील परिस्थिती या क्षणी भट्टी हळूहळू गरम होत असल्यासारखी दिसत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना भीती वाटत होती की रशियन सैन्य चेर्नोबिल अणु प्रकल्प काबीज करेल.
आणि ते आता प्रत्यक्षात घडलंय.
1986 सारखी दुर्घटना घडू नये म्हणून आमचे सैनिक जीवावर खेळून हा परिसर वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले होते.
रशियाने ही अणुभट्टी आता आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती जाहीर केली आहे.
युद्धामुळे याठिकाणी हल्ला झाल्यास किंवा प्लांटच्या तळघरात एखादे छोटे छिद्र पडल्यास किरणोत्सर्गाचा प्रसार भयावह पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे जवळपासच्या परिसरातील नागरिकांचा त्रास वाढणार आहे. 1986 च्या स्फोटामुळे हजारो लोक मरण पावले होते, किरणोत्सर्गी ढगांनी संपूर्ण युरोप व्यापला होता.त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या/अपडेट्स
रशिया युक्रेन युद्ध latest update :अमेरिका एक्शन मोडमध्ये बोलावली बैठक
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 26, 2022 10:48 AM
WebTitle – Chernobyl reactor accident, the most dangerous place on earth main nuclear station Chernobyl disaster