तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एका शाळेत शुक्रवारी अचानक 30 मुलांची तब्येत बिघडली. मुलांना डोळ्यांत जळजळ, चक्कर येणे आणि उलट्या होण्याच्या तक्रारी होऊ लागल्याने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी तीन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.सदर शाळेत गॅस लीक ची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रयोगशाळेत प्रयोगादरम्यान ही घटना घडली असावी
हा प्रकार चेन्नईच्या थिरूवोत्तियूर भागातील एका शाळेत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील रसायनशास्त्र प्रयोगशाळेत गॅस लीक झाल्याची शक्यता आहे आणि सध्या तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या केमेस्ट्री प्रयोगशाळेत प्रयोगादरम्यान ही घटना घडली असावी, असं प्राथमिक अंदाज आहे. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी डोळ्यांत जळजळ होण्याची तक्रार केली, त्यानंतर इतर काहींना चक्कर आणि मळमळ होऊ लागली. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने शाळेने सर्व बाधित मुलांना रुग्णालयात दाखल केलं.
या घटनेची माहिती मिळताच पालक रुग्णालयात पोहोचले आणि काही पालकांनी शाळेत थोडाफार गोंधळही घातला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
ही घटना घडण्यापूर्वी काही दिवस आधीच तमिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील एका मिडल स्कूलमध्ये सेप्टिक टँकमधून
गॅस लीक झाल्याने 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडले होते. त्यात अनेक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, आणि चक्कर येण्याच्या तक्रारी होत्या.
त्यांना तत्काळ होसूर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
#ChennaiNews #GasLeak #SchoolSafety #StudentHealth #TamilNadu #ChemistryLab #BreakingNews #Emergency
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 25,2024 | 21:23 PM
WebTitle – Chennai School Gas Leak: 30 Students Hospitalized Due to Chemistry Lab Incident