गेल्या दीड दोन वर्षापासुन रियल इस्टेट क्षेत्रात काम करतोय. स्वतः कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उतरलोय. आधी आलेल्या अनुभवांवर मात करायची म्हणुन या क्षेत्रात पाय रोवायचे असं ठरवलेलं, पण इथे आल्यावर त्याच्यापेक्षाही जातीयतेचा भयंकर वाईट अनुभव आला. कन्स्ट्रक्शन, रियल इस्टेट ही क्षेत्रं बौद्ध आणि मुस्लिमांसाठी निषिद्ध आहेत. मुस्लिम आणि बौद्धांना सहजासहजी जागा मिळत नाही, खरेदी विक्री करण्याकरता अडचणी येतात. हे दोन समुह वगळता सर्वच जाती धर्माचे लोक या क्षेत्रातले मातब्बर आहेत.
‘झेंड्यावाला आणि दाढीवाला’ इथे आणायचा नाही
मी कन्स्ट्रक्शन साईट सुरु करण्याकरता बऱ्याचदा जागा बघायला जातो. तेव्हा जागा चांगल्या प्रस्थापित लोकांच्या एरिया मध्ये असु दे किंवा सर्वसामान्य नोकरदार लोकांच्या कॉलनी मध्ये असु देत. पहिला अडथळा असतो तो आजुबाजुच्या लोकांचा. जागा मालक असेल किंवा इस्टेट ब्रोकर त्याला आजुबाजुच्या लोकांनी ताकीदच दिलेली असते की, ‘झेंड्यावाला आणि दाढीवाला’ इथे आणायचा नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाशी कितीही लॉयल असलात, पैसेवाले असलात तरी तुम्हाला तिथे जागा मिळु शकत नाही. बिल्डर जयभीम वाला आहे म्हणुन जागेच्या ठरलेल्या व्यवहाराला नकार येण्याचा किंवा फ्लैट, रो हाउस च्या व्यवहाराला नकार येण्याच्या घटना ही मी गेल्या काही दिवसात अनुभवल्या.
अर्थकारणातला नवजातीयवाद
फ्लैट किंवा रो हाउस बघायला अनेक जण साईटवर येतात, आणि शेजारी पाजारी कोण आहे.
याची पहिल्यांदा चौकशी करदाता, शेजारची बुकिंग जर बौद्ध किंवा मुस्लिम व्यक्तीची असेल
(तो शिक्षक, प्रोफेसर, वकील कुणीही असला तरी) तर सरळ तोंडावर नकार कळवतात.त्यामुळेही अनेकदा आर्थिक फटका बसतो.
आमच्या इथे तर अनेक बिल्डर्स ने ब्रोकर्स ना स्ट्रीक्ट वॉर्निंगच दिलेली आहे, दाढीवाले, झेंडेवाले अजिबात आणायचे नाहीत.
बौद्ध असं सांगितल्याबरोबर तो थोडा चरकला
©अगदी कालच एक ताजा अनुभव आला(तसे रोजच येतात) एक शिक्षक व्यक्तीला रो हाउस हवा होता, माझी रो हाउस ची साईट सुरु नसल्यानं मी त्यांना ब्रोकर सोबत ओळखीच्या साईट वर पाठवलं. त्यांना घर आवडलं, ट्विन रो हाउसेस, किमतीवरुन बोलणंही झालं, त्यांचा ITR , सिबिल स्कोअर, बँकेचे ट्राझँक्शन सगळं काही व्यवस्थित होतं,जळळपास डन होतं. आणि सगळं आटोपल्यावर बिल्डर च्या एजंट हळुच तुमची कास्ट काय अशी विचारणा केली ,
(कारण बाजुची बुकिंग केलेली होती सो कॉल्ड अपर कास्ट व्यक्तीनं) बौद्ध असं सांगितल्याबरोबर तो थोडा चरकला आणि साहेबांशी बोलुन संध्याकाळी सांगतो एवढं बोलला.आणि संध्याकाळी त्याला फोन केला तर समोरुन अपेक्षित उत्तर आलं, ‘सॉरी सर त्या घराचा व्यवहार आधीच झाला आहे, मलाच माहित नव्हतं’.त्या सरांना मिळालेल्या १२ नकारात या १३ व्या नकाराची भर पडली.
ही परिस्थिती भीषण आहे, परंतु आता या सगळ्या परिस्थितीवर आंबेडकरी तरुणांनी
पोकळ विद्रोहाच्या गप्पा हाणण्यापेक्षा आपल्याला समकालात parallel economic system कशी डेव्हलप करता,
किंवा समाजातल्या भांडवल असलेल्या व्यवसायिक तरुणांच्या मागे कसं उभं राहता येईल याचा विचार करावा..
-राहुल सावळे
२६-०८-२०१९
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)