परळी : ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी टीव्ही कलाकार केतकी चितळे आणि कार्यक्रमाचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्याविरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये २९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद झाली होती .या परिषदेत टीव्ही कलाकार केतकी चितळे हिने वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
परळी मधील जागरूक आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्यावतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून संयोजक बाजीराव धर्माधिकारी आणि केतकी चितळे यांच्याविरोधात कलम 295 (अ) तसेच कलम 505 (2) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी शहर चे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
या कारणावरून झाला गुन्हा दाखल
ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात केतकी चितळे ने वादग्रस्त वक्तव्य करत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर अनेकांनी सोशल मिडियावर केतकी चितळेच्या विरोधात या वक्तव्याचा समाचार घेत टीकेचे झोड उठवली होती.
परळी येथील राज्यस्तरीय ब्राह्मण अधिवेशनात केतकी चितळे ने
ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करणारी टोळी सक्रिय असून याचे मोठे रॅकेट आहे.असे वक्तव्य केले होते.
“गेल्या पाच वर्षात किती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत केसेस दाखल झाल्या त्यातील ब्राह्मणांच्या विरोधात किती केसेस दाखल झाल्या याची माहिती काढा..
त्यातील जेन्यूएन केसेस किती प्रत्येक कास्ट (जातीच्या) च्या विरोधात किती याचा सेन्सेस काढा (सेन्सेस?) आरटीआय टाकून”
असे वक्तव्य करत एका वकीलाचे नाव न घेता म्हटलं की या वकिलाने गेल्या पंधरा ते वीस वर्षात 65 ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत केसेस टाकलेल्या आहेत,प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर एकच विटनेस (साक्षीदार) असतो. मुंबईतील दादर मधील एक टीसीवर या वकिलाने ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत केस टाकली आहे. का तर वकिलाकडे तिकीट नव्हतं,लोकलने फिरत होता,टीसीने (तिकीट तपासणीस) थांबवले आणि तिकीट मागितले,तेव्हा वकिलाने म्हटलं की तिकीट नाहीए,तर टीसी म्हणाले फाईन भरा.. यावर ह्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत केस केली की याने माझी जात बघून मला अडवले आणि फाईन मागितली..त्या टीसीलाच जावे लागतेय कोर्टात,हा साईड बिजनेस चालू आहे.हे रॅकेट आहे.हा एक आहे असे अनेक वकील आहेतअशी वादग्रस्त वक्तव्ये करत केतकी चितळेने सर्व समाजाचा रोष ओढवून घेतला आहे.इतकचे नाहीतर ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करावा अशीही मागणी केतकीने यावेळी केली.
मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य
मध्यंतरी केतकी चितळेचा मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर भडकतानाचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सुद्धा काही पोस्ट केल्या होत्या.
त्यामुळे मराठा समाजाही तिच्यावर संतापलेला आहे,यातून तिच्यावर आता गुन्हे दाखल होत आहेत.
लोकशाही आणि संविधानिक मुल्यांवर बोलायला आलेल्या निताशा कौल यांना का घाबरलं मोदी सरकार?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 29,2024 | 21:50 PM
WebTitle – Case Filed Against Ketaki Chitale Over Controversial Atrocity Act Statement