लंडन : भारतीय वंशाच्या नागरिक असलेल्या लंडन स्थित प्राध्यापिका निताशा कौल nitasha kaul यांना केंद्र सरकारने बंगलोर विमानतळावर फक्त डांबून ठेवले नाही तर किमान गरजेच्या वस्तू जशा ऊशी, ब्लॅन्केट सुध्दा दिले नाही, होल्डींग सेल मध्ये डांबून ठेऊन त्यांना पुन्हा लंडनला पाठवले गेले.
![निताशा कौल](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2024/02/nitasha-kaul.png)
निताशा कौल या कर्नाटक सरकारच्या संविधान आणि त्याचे मूल्य यावरील एका संम्मेलनासाठी ‘Constitution and National Unity’ conference आमंत्रित होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या “लोकशाही आणि संविधानिक मूल्य” या विषयावर भाषण देणार असल्याने मोदी सरकारने त्यांना भारतात येऊ दिलं नाही. कर्नाटक राज्य सरकारने सन्मानीय वक्ता म्हणून त्यांनी आमंत्रित केले असताना केंद्र सरकारने अशाप्रकारे अटकाव केला आणि कार्यक्रम स्थळी पोहोचू दिलं नाही.
त्यांचे सर्व कागदपत्र जसे पासपोर्ट, OCI (overseas citizenship of India) वैध असताना कुठलंही कारण न देता फक्त “आम्ही काही करू शकत नाही, आमच्या हातात काही नाही, दिल्लीवरून आदेश आहेत” अशी ऊत्तरं देण्यात आली. माझे प्रवास भाडे आणि राहण्याची व्यवस्था कर्नाटक राज्य सरकारने केली होती आणि तसं पत्र सुध्दा माझ्याकडे होतं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे
कार्यक्रमाला जाता येणार नाही अशी कुठलीही नोटीस केंद्र सरकारने त्यांना दिली नाही.
हा तो देश राहीलाय का ? ज्याचा आपण जयजयकार करतो ?
टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं असून, देशातील सर्वात मोठ्या लकशाहीला माझ्या लेखणीची आणि शब्दांची इतकी भीती कशी वाटली ?
संविधानावर बोलण्यासाठी राज्य सरकारने आमंत्रित केलेल्या प्राध्यपकाची अशी मुस्कटदीबी करणं मोदी सरकारला शोभतं का ?
कुठलंही ठोस कारण न देता ? हा तोच देश राहीलाय का ? ज्याचा आपण जयजयकार करतो ? नक्कीच नाही
अशा प्रश्नाचा भडीमार त्यांनी केला आहे.
प्रा निताशा कौल या नामांकित शिक्षणतज्ञ आहेत. तसेच त्या उदीरमतवादी लोकशाहीमूल्यांची पाठराखण करतात
त्यांनी पुर्वी आर एस एस वर केलेल्या टिकेमुळे त्यांनी हे सहन करावं लागलं अशी अनौपचारीक माहिती त्यांना बॅंगलोर मधील अधिकाऱ्यांकडून मिळाली असं नितीशा कौल याचं म्हणंणं आहे
![amol gaikwad अमोल गायकवाड](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2024/02/amol-gaikwad.png)
अमोल गायकवाड
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,अभियंते, ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा 10 वर्षांचा अनुभव,राजकीय आणि सामाजिक विषयांमध्ये अभ्यास.
‘सरस्वती नव्हे तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता’ असे विधान करणाऱ्या शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 26,2024 | 16:10 PM
WebTitle – Nitasha Kaul, Advocate for Democratic Values, Denied Entry to India; Deported to London