‘सरस्वती नव्हे तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता’ असे विधान करणाऱ्या शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी राजस्थानमधील बारन जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लकडई शाळेतील शिक्षिकेला निलंबित केले आहे. प्रजासत्ताक दिनी शिक्षकांनी कार्यक्रमादरम्यान हिंदू धर्मातील देवता सरस्वतीचे चित्र लावू दिले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी शिक्षिकेचा निषेध करत कारवाईची मागणी केली. बरानच्या किशनगंज भागातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
हेमलता बैरवा यांच्या निलंबनाचे आदेश
‘सरस्वती नव्हे तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता’ असे विधान करणाऱ्या शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले. शिक्षणमंत्र्यांच्या सूचना आणि तपास अहवालाच्या आधारे हेमलता बैरवा यांना निलंबित करण्यात आले आहे. डीईओ पीयूष कुमार शर्मा यांनी सांगितले की, तपासानंतर निरीक्षक हेमलता बैरवा यांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारी शाळेत शिक्षिका अकलिमा बेगम आणि डबरिया शाळेत नियुक्त शिक्षक हेमराज मेघवाल यांना प्रशासकीय कारणांमुळे APO करण्यात आले आहे. तिघांचेही मुख्यालय बिकानेर आहे.
26 जानेवारी रोजी घडली होती घटना
कोटा जिल्ह्यातील बारन जिल्ह्यातील किशनगंज भागातील लकडई गावात असलेल्या सरकारी उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान गावकरी आणि शाळेतील शिक्षक यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांमध्ये हिंदू देवी सरस्वती च्या चित्राचा समावेश नसल्यामुळे प्रकरण तापलं.काही शिक्षकांनी यास विरोध केला,
ग्रामस्थांनी येऊन चित्र ठेवण्यास सांगितले मात्र शिक्षिकेने कुणालाही करू तसे करू दिले नाही
आणि नंतर शिक्षिका असंही म्हणाल्या होत्या की, विद्येची देवी सरस्वती नाही, विद्येची देवी सावित्रीबाई फुले याच आहेत,
त्यामुळे त्यांचे चित्र ठेवण्यात आले आहे. शिक्षिकेच्या या विधानाला जोरदार विरोध झाला होता.
शिक्षणमंत्री दिलावर म्हणाले की, मोठ्या चर्चेनंतर गावचे सरपंच आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तपासाबाबत वरिष्ठांना कळवले होते.
हे प्रकरण वरिष्ठ विभागापर्यंत पोहोचले असता शिक्षणमंत्री दिलावर यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्यता समोर येईल,
सत्य असेल ते करू, असे सांगितले होते. त्यानंतर तपासात शिक्षकाची चूक असल्याचे निष्पन्न झाले आणि आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाई बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आपलं मत नक्की कळवा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 25,2024 | 13:42 PM
WebTitle – Teacher Suspended for Saying ‘Savitribai Phule, Not Saraswati, is the Education Goddess