मुंबई : मुंबई वांद्रे पश्चिम येथील शास्त्री नगर भागात बुधवारी रात्री G+2 (तीन मजली) इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने ट्विट केले की “शास्त्री नगर येथे G+2 इमारत कोसळून एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे – त्याला DOA घोषित करण्यात आले आहे. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. तर 16 जण किरकोळ जखमी झाले आहेत. इतर जखमींच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे.बचाव कार्य अजूनही सुरू आहे.”
आज रात्री 12.15 च्या सुमारास इमारत कोसळली. एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून 16 जण रुग्णालयात दाखल असून
ते आता सुरक्षित आहेत. हे सर्व बिहारमधील मजूर आहेत. बचावकार्य सुरू आहे.
अग्निशमन दल आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत, ” अशी माहिती मुंबई पोलिस डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी दिली.
ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच काहींना स्थानिक लोकांनी बाहेर काढले.
मुंबई पोलिस डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहिती नुसार “रात्री 12.15 च्या सुमारास इमारत कोसळली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 16 जण रुग्णालयात दाखल असून ते आता सुरक्षित आहेत. हे सर्व बिहारमधील मजूर आहेत. बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दल आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत, ”
वांद्र्याच्या शास्त्रीगढ परिसरात उत्तर प्रदेश, बिहारमधून कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या मजुरांची मोठी लोकसंख्या आहे. तीन मजली इमारतीच्या शेजारी बांधलेले घर दोन दिवसांपूर्वी पाडण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर तीन मजली इमारतीचा पाया कोसळल्याचे समजते, असे डीसीपींनी सांगितले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावर जाणाऱ्या तरुणाच्या डोळ्यासमोर इमारत कोसळली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी इतरांच्या मदतीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी बिल्डरने इमारतीला लागून असलेले घर पाडल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे या इमारतीचा पाया काढण्यात आला आणि ही इमारत कोसळली.असा आरोप करण्यात येत आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
औरंगाबाद मध्ये बसमध्ये बॉम्ब ची अफवा; प्रवाशांमध्ये खळबळ
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
RRR Box office collection पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 09 2022 11 : 25 AM
WebTitle – Building collapses at Bandra, Mumbai; One killed, 16 injured