विश्वरत्न महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान आयोजन करण्यात आले होते. विज्ञानरूपी अभिवादनातून पुणे, नागपूर परभणी, नाशिक विभागातून एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन व ९० जनांचे कोवीड लसीकरण करन्यात आले. सालाबाद प्रमाणे दर वर्षी ६ डिसेंबर रोजी देशाच्या काना कोपऱ्यातून अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी मुंबई येथे जात असतात.
संपुर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना आपला त्यात खारीचा वाटा असावा या हेतूने समता सैनिक दल तसेच सर्व संघटना, मंडळे, बुद्धविहार व समस्त आंबेडकर अनुयायांच्यावतीने कोरोनाचं संकट टाळण्यासाठी चैत्यभूमीला न जाता महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आहे तिथूनच रक्तदान व कोविड लसीकरण करूण बाबासाहेबांना अभिवादन करन्यात आले कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाचे सॅल्युटेशन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करन्यात आली.
रक्त – जिथे जात, धर्म, लिंग, पंथ, भाषा गळून पडतात परंतु अज्ञान व रक्तदानाबद्दल जागृती नसल्याकारणाने
आज राज्यात मुबलक असा रक्त साठा नाही कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता
आंबेडकर अनुयायांनी भावनीक न होता कृतीशील अभिवादनाला प्राधान्य दिले.
सिटू संघटना, MBCPR team, दान पारमिता फाउंडेशन नाशिक, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आज विलास वाघमारे, संजय गायकवाड, गुणवन्त शिंदे, अंकित दोंदे, नितीन पिंपळीसकर यांच्यासह 45 बांधवानी रक्तदान करून बाबासाहेबांना एक अनोख्या पध्दतीने अभिवादन केले,विशेष म्हणजे आजच्या दिवशी सुनील खरे व नूतन खरे ह्या दोघंही पती पत्नीने रक्तदान करून बाबासाहेबांना एक कृतज्ञता पूर्वक अनोखे अभिवादन केले
प्रत्येक महिन्यात एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला
ह्यावेळी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला,प्रत्येक महिन्यात एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला आयोजित करण्याचे ठरवण्यात आले, व त्या माध्यमातून बाबासाहेब यांचे शेतकरी, कामगार, महिला , जलनीती व सर्वव्यापी बाबासाहेब व्यख्यानातून जनजागृती करण्याचे ह्यावेळी डॉ डी एल कराड यांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले.
सकाळी रक्तदान शिबिराचे उदघाटन सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या हस्ते करण्यात आले,
तत्पूर्वी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
या शिबिरास यशस्वी करण्यासाठी संतोष आंभोरे, आत्माराम डावरे, सुनील खरे,
नितीन पिंपळीसकर, रावसाहेब धिवर, आकाश खरे, रवींद्र आढाव, आराध्या गायकवाड, इत्यादींनी प्रयत्न केले
एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन
एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन
विभाग नागपुर – ५१५+ पिंपरी – १९१ ,नाशिक – ४५ , परभणी – २६, औंध – २५, भेकराईनगर- २२, पुणे स्मारक – २१, व काही तांत्रिक अडचणींमुळे एक दोन ठिकाणी रक्त दान शिबीर होवू शकले नाही त्याबद्दल स्थानिक आयोजक व स.सै.द. वतीने दिलगीरी व्यक्त करत आहोत.तसेच सर्व आयोजक टिमचे मन:पुर्वक अभिनंदन.
कोणाचेही आभार न मानता आपल्या सर्वांचे हे आद्य कर्तव्य समजून मानवहिताच्या कार्यात
बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होवून तन मन धनाने आपन सदैव कार्यरत रहाल ही अपेक्षा समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात येते.
महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य प्रदेश इंदोर मध्ये रक्तदान शिबिर
जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 07, 2021 18:45 PM
WebTitle – Blood donation on the occasion of Mahaparinirvan, collection of 845 blood bags