इंदोर (म. प्र.) – महामानव युगपुरुष भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त आदरांजली म्हणून मध्य प्रदेश इंदोर येथील आंबेडकरी अनुयायांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मानवता आणि समतेसाठी भीम अनुयायांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
महापरिनिर्वाण दिन निमित्त इंदोर मध्ये रक्तदान शिबिर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवार, ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर युवा समिती (Days), इंदोरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या स्मरणार्थ गरजू लोकांना रक्तदान करण्यात आले.गीता भवन चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिरात समाजातील तरुणांनी मोठ्याप्रमाणावर सहभाग नोंदवला.
समाजसेवक मुरलीधर राहुल मेटांगे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
तसेच शिबिरात जमा झालेले रक्त शासकीय माय ब्लड बँकेमार्फत गरजू लोकांना दान केले जाते.
इंदोर शहरात डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिर सुरू करण्याचा पुढाकार समितीनेच घेतला आहे. रक्तदान शिबिरादरम्यान मुरलीधर राहुल मेटांगे, भीमा सरदार, रघुवीर मरमट, भरत निंबाडकर, महेश जाटव, ईश्वर तायडे, योगेंद्र गावंडे, लकी पिसे, वंदना मारमट, रत्ना खैरनार व इतर अनुयायी उपस्थित होते.
तत्पूर्वी, मेणबत्त्या प्रज्वलित करून व बाबासाहेबांच्या प्रतिमेला व संविधान प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करून त्याचे वाचन करून बुद्ध वंदना व भीम स्तुती जयघोष करण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने डॉ.आंबेडकर युवा समितीला स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले. डॉ. आंबेडकर युवा समितीतर्फे रक्तदानासाठी आलेल्या डॉक्टरांचे संघप्रमुख डॉ रामू ठाकूर जी यांना स्मृतिचिन्ह म्हणून तथागत बुद्धांचे चित्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचा समारोप करण्यात आला.
जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना..आत्मशोध घेताना..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 07, 2021 13 :45 PM
WebTitle – Blood donation camp in Indore, Madhya Pradesh on the occasion of Mahaparinirvan Day