आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती.राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या.
२५ जून ही भारतीय लोकशाहीतील एक काळी तारीख मानली जाते.त्यात काही चुकीचं नाही.
मुद्दा हा आहे की यावर बोलतंय कोण?
भाजपा? यांना यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
तुम्ही तर सत्तेवर आल्या आल्या आणीबाणी लादण्यासाठी आतुर झाला होतात.आठवतात का ते जीआर सरकारी नियम?
ज्यात सरकारच्या गालगूच्चे घेणे पापे घेणे लिहिलं होतं.त्याशिवाय टीका करता येणार नाही असे नियम होते.
ते लोकांनी धारेवर धरून उडवून लावलं आणि न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला
म्हणून ते एकतर्फी सरकारी जबरदस्तीचं लव्हलेटर कचऱ्याच्या डब्यात फेकावं लागलं होतं.
परंतु तरीही तुमच्याकडून नागरिकांचा आवाज दाबणे सुरूच राहिले.
तुमची पद्धत थोडी वेगळी आहे.मॉर्निंगवॉक वाली.लोकाना माहीत आहे ती.
तुम्ही कॉँग्रेस प्रमाणे जाहीर न करताही आणीबाणी पेक्षाही भयंकर पद्धतीने राज्यकारभार केला आणि अजूनही करत आहात.
जेव्हा भीमाकोरेगाव हिंसाचार घडवून आणलात,त्यानंतर पोलिसांकडून जे आंबेडकरी तरुणांचे कोंबिंग ऑपरेशन केले गेले.त्यांना अमानुष पद्धतीने शारीरिक मानसिक अत्याचार करून हाल हाल करत झोडपले.ती आणीबाणीपेक्षाही वाईट घटना होती.देशभरात हिंदू धर्माच्या नावाखाली मॉब लिंचिंग करून मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजातील लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात आले ती घटना आणीबाणीपेक्षाही वाईट घटना होती.
कुलदीप सेंगर या आरएसएसच्या स्वयंसेवक आणि तुमच्या खासदाराकडून एका मुलीवर अत्याचार करण्यात आला.त्यानंतर पोलिस स्टेशन मध्येच तिच्या वडिलांवर अमानुष पध्दतीने अत्याचार करण्यात आला.ते शेवटी पाणी पाणी करत तडफडत राहिले.न्याय मागणाऱ्या लोकांवर तुम्ही अशा पद्धतीने व्यवहार केलात.विशेष म्हणजे तुम्ही जे हिंदू हिंदू करता हिंदुत्ववादी राजकारण करता ती बळी पडलेली तरुणी हिंदुच होती.ती घटना आणीबाणीपेक्षाही वाईट घटना होती.
हाथरस मध्ये एका मागासवर्गीय तरुणाचा बलात्कार करून खून करण्यात आला.त्यावेळी तर तिच्याच कुटुंबावर दबाव आणला गेला.
पत्रकारांना अडवण्यात आले.बातमी करू दिली गेली नाही.
सिद्दीकी कप्पन या पत्रकाराला तुरुंगात टाकण्यात आले.
लाइव्ह लॉ च्या वृत्तानुसार,उत्तर प्रदेश सरकारने कप्पन यांना रुग्णालयाच्या बेडवर साखळ्यानी बांधून ठेवण्यात आले होते.
डॉक्टर कफील खानचा मुद्दा तर आणखी भयंकर आहे.काहीच चूक नसताना आणि काही बाळांचे प्राण आपल्या वैयक्तिक गोष्टीतून वाचवलेल्या या मानवतावादी डॉक्टरला एक वर्षापेक्षा जास्त तुरुंगात सडवत ठेवले होते,शेवटी न्यायालयाने हस्तक्षेप केला म्हणून त्याचा जीव वाचला नाहीतर त्याला असेच सडवून मारले असते.ही घटना आणीबाणीपेक्षाही वाईट घटना होती.दिल्लीत झालेला हिंसाचार आणि बघणारे पोलिस.मार खाणारे विद्यार्थी पुन्हा पोलिसांकडून झोडपून काढलेले विद्यार्थी..दिल्लीची दंगल.. त्यानंतर किसान आंदोलन जे आजही सुरू आहे.ज्यात पोलिसांच्या समोर दगडफेक सुरू होती. आणि वृत्त वाहिन्यांवर हे लाईव सुरू होतं.या घटना आणीबाणीपेक्षाही वाईट घटना आहेत.
मध्यंतरी बोबडी झालेली न्यायव्यवस्था आता थोडी अडखळत बोलू लागली आहे. न्याय व्यवस्थेत सुद्धा तुम्ही कॉलेजियम सिस्टम आणून आणीबाणी लादलेली आहे.देशातील सरकारी कंपन्या विकूनही तुम्ही इथल्या गरीब मध्यमवर्गीय लोकांच्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करून आणीबाणी लादली आहे.तुमचे हे जनता विरोधी कारनामे लिहीत राहिले तर दिवस पुरणार नाही.परंतु याचा थोडक्यात ठळक आढावा घेतला आहे. कॉँग्रेसची आणीबाणी निदान घोषित होती अन त्या अर्थाने ती अधिकृत म्हणता येईल अशी पण तुमची तर अघोषित आणीबाणी आहे.तुम्हाला इतर कुणाच्या आणीबाणीवर बोलण्याचा यत्किंचितही अधिकार नाही.
आपल्याकडे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे *ते प्रसिध्द कोट (प्रसंग) वापरलं ज्यात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना “राज धर्म पाळण्याची सूचना केलेली,खडसावले होते” ते कोट चलाखीने मिसकोट केले जाते अन पुढे त्यांनी कौतुक केले की तुम्ही राज धर्म पाळत आहात असं म्हटलं.. हे जनरली असं होतं कारण तुम्ही एका पब्लिक मीटिंग मध्ये लोकांना संबोधित करत असता.आणि हजारो लोक तुम्हाला ऐकत असतात.त्यावेळी ते ऐकताना नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर झरकन बदलणारे भाव आणि अवघडलेली परिस्थिती पाहिली तर लक्षात येतं की वाजपेयींनी नंतर त्यांना सावरून घेतले.जास्त अपमान नको म्हणून ते कौतुक नसून वेळ मारून नेणे असं म्हणतात.त्यानंतर मात्र सगळं चित्र बदललं मात्र राजधर्माची आठवण करून द्यायला ना आता वाजपेयी आहेत ना अडगळीत टाकलेले साईड लाइन केलेले आडवाणी.. ही पक्षात सुद्धा एक प्रकारची आणीबाणीच तर अशा लोकांनी नैतिकता पाळत किमान अशा मुद्यावर तरी बोलू नयेच..
By Milind dhumale
#DarkDaysOfEmergency #Emergency1975
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 25 , 2021 20: 10 PM
WebTitle – BJP has no right to speak on emergency 2021-06-25