बिहार च्या लखीसराय (Lakhisarai) स्थित लाल डोंगरावरील खोदकामात गंगा घाटवरील पहिले प्रशस्त बौद्ध विहार (बुद्धिस्ट मोनेस्ट्री) सापडले आहे. जानेवारीत याचे खोदकाम पूर्ण झाले.खोदकाम करणाऱ्या विश्वभारती विश्वविद्यालय शांतिनिकेतन च्या प्राध्यापक अनिल कुमार (Anil Kumar) यांनी सांगितले की 11 व्या-12 व्या शतकातील या विहारात वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सापडल्या आहेत.ज्या इतर विहारात पाहण्यास मिळत नाहीत.
अनिल कुमार म्हणाले की, उत्खननात सापडलेल्या गोष्टी सूचित करतात की हे मठ/विहार प्रामुख्याने महिलांसाठी बांधले गेले असावेत.पाल रानी मल्लिका देवीने विजयश्री भद्र नावाच्या एका महिला बौद्ध भिक्खू ला दान दिल्याचे रेकॉर्ड्सवरूनही समजते. तसेच हे ठिकाण पाहिल्यावर असे दिसते की चारही बाजूंनी सुरक्षा व्यवस्थादेखील केली गेली आहे, जे बर्याचदा महिला राहतात अशा ठिकाणी केली जाते.
मठातील प्रत्येक खोलीस दरवाजे
या मठातील सर्व खोल्यांमध्ये दरवाजे सापडले आहेत, तर सहसा नालंदा, विक्रमशिलासारख्या मठांमध्ये दरवाजे सापडले नाहीत. यासह येथे तांबा धातूच्या बांगड्या, हस्तिदंताची अंगठी, नाकाच्या पाकळ्या इत्यादी आढळल्या आहेत. हे सूचित करते की हे मठ विशेषतः एकतर महिलांसाठी तयार केले गेले असेल किंवा पुरुष किंवा स्त्रिया दोघांसाठीही असू शकते.
लाल डोंगर (लाल पहाडी) च्या उत्खननात प्रथमच लाकडापासून बनविलेले एक वोटिव टेबलेट सापडले. तसेच चिकनमातीच्या दोन जळलेल्या मोहरांवर ‘श्रीमदाधर्मभिर्वचिका’ हे नाव कोरेलेले आढळून आले.हे नाव दर्शविते की प्रारंभिक मध्ययुगीन मगध राज्यसत्तेत महायान बौद्ध धर्माची किती प्रतिष्ठा होती.
अनिल कुमार म्हणाले की हे राज्यातील पहिला बौद्ध विहार (बुद्धिस्ट मोनेस्ट्री) असावं ज्याने बिहार राज्याला नाव दिले.जसे की नालंदा,विक्रमशिला आणि तेलहारा मध्ये महाविहार सापडले होते.ते म्हणाले की नालंदा,विक्रमशिला आणि तेलहारा नंतर हे पहिले मोठे महाविहार आहे.इथे सापडलेल्या मोहरांवर विहाराचा उल्लेख आहे.साधारणपणे महाविहारांची नावे भारतीय पुरात्व विभाग आणि एपिग्राफिक रेकॉर्डवरुन शोधले जातात. किंवा तसे अनुमान लावले जाते.
इतर विहारांच्यापेक्षा वेगळी वास्तूकला
या मठातील वास्तूकला पूर्व भारतीय बौद्ध विहारांच्या तुलनेत वेगळी ओळख देणारी आहे.परस्पर जोडलेल्या खोल्या, लाकडी चौकटी, मठातील प्रत्येक बाजूला तीन विशाल बुरुज, डझनभर लाकडांच्या डझनभर मोहरा आणि चुन्याचा वापर करून बनवलेल्या जमीन लाल, हिरव्या, पिवळ्या, पांढर्या आणि काळा रंगांचा वापर इ. लाल डोंगरचा (लाल पहाड) वारसा सांगत आहे अनिल कुमार म्हणाले की यापूर्वी बिहारच्या कुठल्याही भागातून विहार स्तरावरील मठ स्थापत्यशास्त्राचा पुरावा मिळालेला नाही. ते म्हणाले की, उत्तर बंगालमधील जगजीवनपूर येथील उत्खननात असे एकमेव पुरावे सापडले आहेत.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खोदकाम सुरू केले होते
लखीसराय बुद्धिस्ट मोनेस्ट्री सापडली त्या लाल टेकडीचे उत्खननाचे काम मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 25 नोव्हेंबर 2017 रोजी सुरू केले होते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडून परवाना मिळविल्यानंतर
आणि 2017 मध्ये बिहार सरकारबरोबर सामंजस्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी झाल्यानंतर
3 वर्षांच्या आत बिहारमधील हा पहिला उत्खनन प्रकल्प ठरला आहे.
तेव्हापासून या टेकडीवर (बुद्धिस्ट मोनेस्ट्री) बौद्ध विहार संबंधित अनेक अवशेष सापडले असून
यात आता यश मिळताना दिसत आहे.भारतात कुठेही उत्खनन केले की तिथे बौद्ध संस्कृतीशी संबंधित अवशेष मिळत असतात.
अनिल कुमार यांनी सांगितले की उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून असे दिसून आले की
डोंगराच्या प्रत्येक कणात बौद्ध वारशाचा खजिना आहे.म्हणूनच ही लाल टेकडी बौद्ध विहार म्हणून ओळखली गेली.
हेही वाचा… भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
हेही वाचा… सिद्धार्थ यशोधरेला सोडून गेला होता का ?
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on March 22 , 2021 16 :11 PM
WebTitle – bihar lakhisarai hilltop buddhist monastery