ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही संबोधले जात असे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा त्यांनी नुकतीच स्वतःची एअरलाइन सुरू केली होती. तीचे नाव आकासा एअर (Akasa Air news) आहे. त्यांना स्टॉक मार्केटचा बिग बुल देखील म्हटले जात असे.(Rakesh Jhunjhunwala passes away )
त्यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची आकासा एअरमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. दोघांचा एकूण वाटा ४५.९७ टक्के आहे.फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, झुनझुनवाला हे शीर्ष 500 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांमध्ये स्थानावर होते, त्यांची एकूण संपत्ती जुलै 2022 पर्यंत $5.5 अब्ज आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने राकेश झुनझुनवाला यांचे निधन
राकेश झुनझुनवाला यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सकाळी 6.45 च्या सुमारास
ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांची प्राणज्योत मालवली,हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी त्याना मृत घोषित केले.
गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने संपूर्ण बाजारपेठ हळहळली आहे.
झुनझुनझुनवालाबद्दल असे म्हटले जात होते की, मातीला हात लावला तरी त्याचे सोने होते.
राकेश झुनझुनवाला यांनी ३६ वर्षांपूर्वी गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला होता.
फक्त 5,000 रुपयांपासून त्यांनी सुरुवात केली होती. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटी इतकी होती. ज्या स्टॉकवर त्यांचा जादुई हात पडायचा तो रातोरात उंची गाठायचा. यामुळेच त्यांची प्रत्येक हालचाल गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांची नजर असायची. स्टॉक्स निवडण्यामध्ये त्यांची नजर अतुलनीय होती.त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केल्यापासून हे खरे ठरले होते. त्यामुळे राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणून प्रसिद्ध झाले.
झुनझुनवाला RARE एंटरप्रायझेस नावाची खाजगी ट्रेडिंग कंपनी चालवत होते, हे नाव त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाच्या आद्याक्षरावरून ठेवले होते.त्यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. ते मुंबईत मोठे झाले,त्यांचे वडील आयकर अधिकारी म्हणून मुंबईत पोस्टिंग ला होते. झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये सिडनहॅम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये सामील झाले.
माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात निधन
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 14,2022, 10:12 AM
WebTitle – Big bull billionaire Rakesh Jhunjhunwala passed away at the age of 62