माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.(Vinayak Mete Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील माडप बोगद्यामध्ये हा अपघात झाला. माजी आमदार त्यांच्या एसयूव्ही कारमधून जात होते. यादरम्यान अपघात झाला, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज हरपल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनायक मेटे रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झाले होते.अपघाताची माहिती मिळताच त्यांना नवी मुंबईतील कामोठे परिसरात असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पोहोचले आहेत. मेटे यांची कार बीडकडून मुंबईकडे येत होते. या दरम्यान, मेटेंच्या कार चालकाने गंभीर आरोप केले आहेत. राम ढोबळे पोलीस बॉडीगार्ड गंभीर जखमी आहेत.
आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते.
यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.अपघातात झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही.
जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली.
उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलाय.
नेमका अपघात कसा झाला?
विनायक मेटे यांच्या एसयूव्ही कारला एका मोठ्या ट्रकने डाव्या बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी मध्यमांशी बोलताना दिली.
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे होते. त्यांचा जन्म 30 जून 1970 रोजी बीड येथे झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात विनायक मेटे यांचे नाव झपाट्याने पुढे आले होते.मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ही अत्यंत दु:खद घटना आहे. विनायक मेटे बेधकडपणे समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका मांडत होते. त्यांचं निधन हे समाजाचं मोठं नुकसान आहे. हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. – अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: न्या.प्रतिभा सिंह
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 14,2022, 09:12 AM
WebTitle – Former MLA Vinayak Mete died in an accident on the Mumbai-Pune Expressway