Ukraine Russia War: रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल २३-०२-२०२२ रोजी रात्री साडेआठ वाजता युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली. या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, पुतिनने इतर देशांना इशारा दिली की रशियन कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास “त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसेल” असे परिणाम होतील.दुसरीकडे रशिया ने युक्रेन च्या धोकादायक अशा न्यूक्लियर पावर प्लांटवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील 70 हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत, ज्यात 11 एअरफील्डचा समावेश आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील 74 लष्करी सुविधा नष्ट झाल्या आहेत. ते म्हणाले की, नष्ट झालेल्या लष्करी तळांमध्ये 11 एअरफील्डचाही समावेश आहे. युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेन पोलिसांनी गुरुवारी सांगितले की रशियाने दिवसाच्या सुरुवातीपासून 203 हल्ले केले आहेत
आणि युक्रेनच्या प्रदेशात जवळजवळ सर्वत्रच जोरदार लढाई सुरू आहे.
आपत्कालीन सेवांनी म्हटलंय 14 जणांना घेऊन जाणारे एक युक्रेनियन लष्करी विमान,राजधानी कीवजवळ क्रॅश झाले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशात लष्करी राजवट घोषित केली आहे,
तसेच रशिया सोबत असणारे सर्व प्रकारचे राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत.
चेर्नोबिल न्यूक्लियर पावर प्लांटवर कब्जा करण्याचा प्रयत्न
रशिया च्या सैन्याने युक्रेन मधील चेर्नोबिल हा न्यूक्लियर पावर प्लांट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला असून,
असे झाले तर हे संपूर्ण युरोपवर मोठे संकट निर्माण होईल असा इशारा दिला आहे.
चेर्नोबिल न्यूक्लियर पावर प्लांट
Pripyat शहरातील चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. २६ एप्रिल १९८६ रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामधील (आजच्या घडिला युक्रेनमधील) चेर्नोबिल आण्विक अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक आण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या आण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.
दुर्घटना घडली तेव्हा कुणाच्या लक्षात आले नाही की एवढा मोठा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे Pripyat शहर त्वरित रिकामे करण्यात आले नाही. शहरवासी, स्थानिक वेळेनुसार रात्री 01:23 वाजता,हा स्फोट झाला. जे घडले त्याबद्दल त्याना काहीही कल्पना नव्हती.मात्र, स्फोटानंतर काही तासांतच अनेक लोक आजारी पडले. नंतर, त्यांनी खोकला आणि उलट्या तसेच अनियंत्रित फिट्ससह गंभीर डोकेदुखी आणि तोंडात विशिष्ट धातूची चव नोंदवली गेली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर
युक्रेनच्या एका खासदाराने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे “21 व्या शतकातील हिटलर” असल्याचे म्हटले आहे आणि युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ते थांबणार नाहीत असा इशारा दिला आहे.ओलेक्सी गोंचारेन्को यांनी स्काय न्यूजला सांगितले: “पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर आहेत. 21 व्या शतकात युरोपच्या मध्यभागी, हत्या, नागरिकांचे बळी, बॉम्बफेक, रॉकेट हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत.
“माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत. हे केवळ युक्रेनचे चित्र नसून हे खूप मोठे चित्र आहे.
पुतीन यांना आता थांबवले नाही, तर ते तिसरे महायुद्ध होईल. ते केवळ युक्रेनसोबत नाही,
तर पुढे जाणार आहे. मग ते बाल्टिक देश असतील, मग ते पोलंड असतील.सगळे यात भरडले जाणार आहेत.
रशिया-युक्रेन संकटामुळे तेलाच्या किमती सात वर्षांत प्रथमच $100 च्या वर गेल्या आहेत.
युरोपीयन गव्हाच्या किमतीतही वाढ झाली आहे.रशियाने युक्रेनच्या नाटो आणि युरोपियन युनियनकडे जाण्याला बराच काळ विरोध केला आहे.
रशिया युक्रेन युद्ध latest update :अमेरिका एक्शन मोडमध्ये बोलावली बैठक
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 24, 2022 22:27 PM
WebTitle – Big threat: Russia prepares to seize Ukraine’s chernobyl nuclear power plant