महाराष्ट्र, बिहार, लडाख आणि आंध्र प्रदेशसह देशातील 13 राज्यांमध्ये राज्यपाल बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपालांची नियुक्ती करतात. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती अब्दुल एस नजीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे. Justice (Retd.) S. Abdul Nazir as Governor of Andhra Pradesh यावरून आता सोशल मिडियात लोक चर्चा करायला लागले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीत न्यायमूर्ती अब्दुल नजीर होते
निवृत्तीच्या आधी, न्यायमूर्ती अब्दुल एस नझीर नोटाबंदी प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग होते.
त्यांनी केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
न्या.अब्दुल नजीर हे तिहेरी तलाकच्या विरोधात निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचेही सदस्य होते.
न्या. अब्दुल नझीर हे अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या सुनावणीच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते.
न्यायमूर्ती नझीर हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दुसरे सदस्य आहेत ज्यांनी 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला, ज्यांना सेवानिवृत्तीनंतर सरकारी नियुक्ती मिळाली आहे. जस्टिस नझीर यांच्या आधी सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश जस्टिस रंजन गोगोई यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे. आता न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्या. एस. अब्दुल नजीर यांनी निवृत्तीच्या प्रसंगी म्हटले होते की, त्यांना हवे असते तर अयोध्या वादात इतर चार न्यायमूर्तींच्या विरोधात मत ठेवून ते आपल्या समाजाचे हिरो बनले असते, परंतु त्यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च मानले. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात समाविष्ट असलेल्या पाचही न्यायमूर्तींनी एकमताने अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या बाजूने निर्णय दिला.
न्यायमूर्ती अब्दुल नजीर कोण आहेत ?
न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका गावचे आहेत. एस. अब्दुल नजीर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शालेय शिक्षणादरम्यानच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि कर्नाटकच्या न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली.
न्यायाधीश नझीर नाटकात महिला गायिका असायचे
न्यायमूर्ती नझीर यांच्या छंदांचा संदर्भ देताना CJI म्हणाले, “न्यायमूर्ती नझीर यांना त्यांच्या महाविद्यालयीन काळात थिएटरची आवड होती. त्यांनी अनेक नाटकांचे संवाद आणि दृश्ये लिहिली आहेत. स्वत: नकटमध्ये प्रमुख महिला गायिका म्हणून काम केले आहे. ते तुलू गाण्यांसाठी ओळखले जात होते.
विद्यापीठ स्किट प्रकरण: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; तक्रार दाखल.
मोहन भागवत जातीप्रथा निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घेणार का ?
जाती भगवान ने नहीं, पंडितों ने बनाई.. – मोहन भागवत
अदानी हिंडेनबर्ग अहवाल : व्यवहारात पारदर्शकता आवश्यक
संभाजी भिडे गडकोट मोहीम वादात,दुर्गंधी पसरली; कारवाईची मागणी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 12,2023 12: PM
WebTitle – Ayodhya dispute, demonetisation, triple talaq verdict Judge Abdul Nazeer becomes Governor