माजी खासदार व शेतकऱ्यांचे लढाऊ नेते मा.राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते मुक्ती संघर्ष समिती या संघटनेला सर्वोत्तम उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार” देण्यात आला.
सर्वोत्तम सामाजिक संस्था या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समितीला “भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३” हा माजी खासदार व शेतकऱ्यांचे लढाऊ नेते मा.राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते रविवार ०८ जानेवारी २०२३ रोजी ७ व्या युवा बौद्ध धम्म परिषदेमध्ये प्रधान करण्यात आला.यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे संघटक कार्यकर्ते बाळु भाऊ,संजय भाऊ व युवा संघटक अक्षय भाऊ उपस्थित होते.
सातव्या धम्म परिषदचेआयोजन भंते नागरत्नजी सभामंडप, हुपरी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या निमित्ताने प्रामाणिक, निष्ठावान, सक्रिय आणि समाजहितासाठी योगदान असणाऱ्या मान्यवरांची तसेच मंडळांची निवड केली जाते. पुरस्कार समितीने निर्धारित केल्याप्रमाणे “सर्वोत्तम सामाजिक संस्था” या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपणास “भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३” मुक्ती संघर्ष समिती या संघटनेला देण्यात आला आहे. आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती तर आहेच.शिवाय लढण्यासाठी आमची उर्मी वाढविणारा आहे.
आजपर्यंत मुक्ती संघर्ष समिती या संघटेनेत कार्य केलेल्या सर्वांचा सन्मान आहे.तसेच ज्यांच्या साठी आम्ही लढा दिला.
त्यांचेही योगदान आहे.या संघटनेत काम करत असलेले सर्व स्री पुरुष कार्यकर्ते यांच्यामुळेच ही संघटना
जनमानसात चळवळ व विचार पेरू शकली आहे.
युवा बौध्द धम्म परिषद (महाराष्ट्र व कर्नाटक राज्य) यांचे प्रा. किरण भोसले, संयोजक/अध्यक्ष; सतीश भारतीय,
राज्य सचिव; संतोष भोसले प्रदेशाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आभार मानले.
जलेबी बाबा वर कोर्टाचा निर्णय;120 अश्लिल व्हिडिओ व्हायरल
अशोक स्तंभ:शोधलेल्या इंग्रजाने घराला ‘सारनाथ’ नाव दिलं, ते राष्ट्रीय चिन्ह कसे बनले?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 09,2023 13:07 PM
WebTitle – Award by Raju Shetty to Mukti Sangharsh Samiti