कोल्हापूर- विश्व बौद्ध धम्म ध्वज दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा बौद्ध धम्म परिषद चे आयोजन येत्या ८ जानेवारी २०२३ रोजी भंते नागरत्नजी सभामंडप, यशवंत मंगल कार्यालय, यशवंतनगर, चांदीनगर, ऊर्जाभूमी, हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे होत आहे. युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य या संस्थेमार्फत या धम्म परिषदचे आयोजन केले जाते.
७ व्या युवा बौद्ध धम्म परिषद चे उद्घाटक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब, धम्मदेसना पूज्य भंते एस. संबोधी, भंते आर. आनंद व भंते पय्यावजिरो यांची असणार असून प्रमूख वक्ते मा. श्रावण दादा गायकवाड, औरंगाबाद हे असणार आहेत. संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांचा संविधान संवाद कार्यक्रमसुध्दा आयोजित करण्यात आला आहे.
७ वी युवा बौद्ध धम्म परिषद ०८ जानेवारी रोजी हुपरी मध्ये
धम्मदिक्षा सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य रक्तदान शिबीर, स्नेहभोजन,
आणि भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार-२०२३ चा प्रदान सोहळा असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.
या संस्थेमार्फत केवळ परिषदा घेतल्या जातात असे नाही तर वर्षभर सातत्यपूर्ण कृतीकार्यक्रम राबवून
धम्म चळवळ गतिमान केली जात आहे. परिषदेत संमत केलेले ठराव अमलात आणले जात आहेत.
“दर रविवार जाऊया बुद्ध विहार”, “वेळोवेळी धम्म चर्चा करणे आणि ऐकणे”, “कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा साजरा करणे”, “गाव तिथे विहार, विहार तिथे ग्रंथालय”, “जवळची श्रद्धास्थाने रूढ करणे”, “बौद्ध परंपरेचा शोध आणि प्रचार प्रसार करणे” इत्यादी कृतीकार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत. तेंव्हा या परिषदेचे महत्व ओळखून १०/- रुपयाचे अर्थदान 9527081615 या मोबाईल नंबरवर ऑनलाईन करण्याचे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण भोसले, राज्याध्यक्ष डॉ. संतोष भोसले, राज्य सचिव मा. सतिश भारतवासी, डॉ. मिलिंद हिरवे, राज्य संघटक प्रा. रणजीत भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभि. बापूसाहेब राजहंस, कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता मा. अनिता गवळी, सहसंयोजक समविचारी संस्था/संघटना आणि संयोजन समितीने केले आहे.
दलितांच्या पाण्याच्या टाकीत मानवी विष्ठा,अनेक लहान मुलं आजारी
ळे चा राग अनावर, ट्रोलर ला शिवी देत म्हणाली xx
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08,2023 13:45 PM
WebTitle – 7th Youth Buddhist Dhamma Parishad today in Kolhapur Hupari