मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी नुकतेच लंडन मधील रॉयल हॅलोवे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून एमएससी इन इलेक्शन कॅम्पेनिंग ॲण्ड डेमोक्रसी याविषयात शिक्षण संपादन करून स्वगृही परतले आहेत. त्यांचे आगमन फक्त भारतात झाले नसून भारतीय राजकारणात देखील झाले आहे.या पार्श्वभूमीवर सुजात यांची मुंबईत भव्य रॅली आयोजित कऱण्यात आली होती.तसेच आगामी निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून पहिली राजकीय सभा देखील आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी अनेक विषयावर आपलं मत मांडलं.यावेळी त्यांनी अमित ठाकरे यानी हनुमान चालीसा म्हणावा असे आव्हान दिले आहे.
काल गुढी पाडाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दादर,छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा झाली.या सभेत त्यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणा असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले होते.त्यांच्या या वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी टीका करत खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Amit Thackeray) यांनी खरपूस समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरे यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून दाखवावी, असं आव्हानच सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले, तर मी तिथे हनुमान चालीसा म्हणायला लावेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
सुजात आंबेडकर काय म्हणाले?
माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे…फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे..जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला.. त्यांनी टीशर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये.. मग हनुमान चालीसा म्हणा..मला एकही एक बहुजन माणूस तिथे नकोय तिकडे.
राज साहेबांना ही कळकळीची विनंती..तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या…तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा..पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो..की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी! जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..
दरम्यान कार्यकर्त्यांसमोर म्हणाले, तुमच्या समोर आल्यामुळे मला प्रचंड ताकद मिळाली. मी बऱ्याच दिवसांपासून आज बोलतं आहे. आपली ताकद काल होती तशीच आजही आहे. आपली ताकद कमी होणारं नाही. मागच्या निवडणुकांपासून परिस्थिती बदलली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाणं गरजेचं आहे. लाटेवर जायचं नाही कारण नरेंद्र मोदी (Narendra Modi) सुद्धा लाटेवर प्रधानमंत्री झाले आहेत. मागच्या 2 निवडणूका लढताना लक्षात आलं आहे की आपण स्वबळावर निवडणुक लढू शकत नाही. आता आपण आपला समाज सोडून इतर समाजाच्या लोकांना आपल्या पक्षाशी जोडायचं आहे,प्रत्येकाने किमान तीन लोकांना जोडायचंय असंही ते यावेळी म्हणाले.
अमित ठाकरे प्रत्युत्तर देणार?
आता सुजात आंबेडकर यांनी केलेल्या आव्हानाला अमित ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकूणच राज्यात मशिदींवर भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वाद चांगलाच गाजण्याचीही चिन्ह आहेत.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
आर्यन खान:समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 03, 2022 16:55 PM
WebTitle – Ask Amit Thackeray to say Hanuman Chalisa – Sujat Ambedkar