मुंबई, दि 16 : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,
यासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून
कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे.
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी
उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी केली होती विनंती
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करोना प्रतिबंधित लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत विनंती केली होती. हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोविड सुरक्षेंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी. जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील-फिनिश बेसिसवर हाफकीनला काम करता येईल. यामधून १२६ दशलक्ष कोविड प्रतिबंधक लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशाप्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग आणि संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता पूर्णपणे कशी वापरता येईल, ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले होते. त्यानंतर आता प्रत्यक्षात मुख्यमंत्री ठाकरे यांची मागणी मान्य झाली आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 16, 2021 09: 25 AM
WebTitle – Approval for the Haffkin Institute to produce covaxin vaccine 2021-04-16
चलो ‘देर आये, दुरुस्त आये’. सिरम आणि भारत बायोटेकला व्हॅक्सीन बनवण्यासाठी दिलेली परवानगी अगोदरच हाफकिनला दिली असती तर आजचे महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते. पुण्यातील हाफकिनच्या कर्मचाऱ्यांनी तशी मागणीही केली होती. आणि सरकारने नाकारल्यावर सोशल मिडीयात एक व्हिडीओ क्लीपही व्हायरल केली होती. त्याचाच परिणाम म्हणून हाफकिनवर दोषारोप लावण्यात आले.
आता मला असा प्रश्न पडतो की हाफकिनचे कर्मचारी जर एवढे आळशी, बेशिस्त आणि फक्त पगारासाठी हपापलेले आहेत तर आता अचानक असे काय घडले की त्यांना भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन बनविण्याची परवानगी दिली गेली? असे तर नाही ना! की सिरम आणि भारत बायोटेक यांचे सरकारशी ‘जवळ’चे संबंध आहेत आणि हाफकिनशी लांबचे?
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या लसीच्या यशापयशाबद्दल अद्यापही साशंकता आहे. पण जर हाफकिनने स्वतंत्ररित्या कोव्हॅक्सिन डेव्हलप केली तर नक्कीच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. पाहू आणखी थोड्या काळातच हेही स्पष्ट होईलच. ???