मुंबई, दि 17 : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA नं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. याच संदर्भात एनआयएनं (National Investigation Agency) प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज सकाळी छापा टाकला होता.
तेव्हापासूच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.
प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 8-9 तुकड्या याठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती.
कोण आहेत प्रदीप शर्मा?
शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. त्यांचे एमएस्सीपर्यंत पर्यंतचे शिक्षण धुळ्यातच झाले.लहानपणापासूनच युनिफॉर्मचे आकर्षण होते.
महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली.
या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे,अस्लम मोमीन असे ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून
सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.
नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली.
प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले.
नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती.
पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
पोलिसांच्या छळाने आत्महत्या केलेल्या घटनेचा ग्राऊंड रिपोर्ट
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 17, 2021 15: 28 PM
WebTitle – Antilia bomb scare case: Ex-Mumbai cop Pradeep Sharma detained by NIA 2021-06-17