नाशिक – येथील योगेश हिवाळे या तरुणाने live व्हिडिओ करून आत्महत्या करत असल्याचे सांगत स्वत:चा जीव घेतला,आपलं जीवन संपवून टाकलं,या व्हिडिओ मध्ये योगेश याने एस एस वराडे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे.त्यामुळे ही आत्महत्या आहे की आत्महत्या करायला भाग पाडले गेले असा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे.पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अमानुष मारहाण आणि अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुषार देवगांवकर यांनी याबाबत योगेश हिवाळे याच्या कुटुंबीय आणि इतर स्थानिकांशी संवाद साधून या घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली.ती पुढीलप्रमाणे
मी पहिल्याच लेखामध्ये म्हटलो आहे,ही संस्थानिक हत्या तर नाही.?
ह्याची सुरुवात २०१९ मध्ये एका अंडाभुर्जीच्या गाड्यावरील किरकोळ वादात होवून हाणामारीत झाली होती.
कालकथीत योगेश हिवाळे व त्याचे मित्र गाड्यावर (13 मित्र) उभे असताना सिव्हील ड्रेसवर कॉन्स्टेबल सागर हजारे येतात व आपल्या पोलीसी स्टाईलने विशी पंचवीशीमध्ये असणाऱ्या तरुणांनाबरोबर अरेरावी बोलतात,त्यांच्यात बाचाबाची होते,त्याला मोठ्या वादाचे स्वरूप प्राप्त होते व त्याचे रूपांतर हाणामारीत होते.ह्या हाणामारीत सागर हजारे ह्यांना जास्त मार लागतो.
सागर हजारे हे पोलीस आहेत हे माहीत झाल्यावर सर्व मुले खूपचं घाबरतात व आपला बचाव करण्यासाठी सैरभैर होतात.योगेश व त्याच्या मित्रांना जेल होते.रिमांड घेतले जाते.ईतकेच नव्हे तर रिमांड मध्ये असताना सागर हजारे ह्यांचे नातेवाईक सुद्धा,(पुरुष आणि महिला मिळून) आपल्या नातलगाला मारल्याचा बदला म्हणून अटक असलेल्या पोरांना मारतात.? आणि योगेशच्या वडिलांना दम्याचा त्रास असताना सुद्धा आणि योगेशने केलेल्या गुन्ह्याची सजा म्हणून हजारे ह्यांचे नातेवाईक त्यांना मारतात..!
कायद्याच्या चौकटीत अशी व्यक्तिगत दुश्मनी काढणे योग्य असते का..? हा सुद्धा प्रश्न पडतो.
आईवडिल हे मोलमजुरी करणारे असल्याने कसाबसा त्याला जामीन करतात व अशी चुकीची कामे करू नको म्हणून ताकीद देतात.
गंजमाळ हे नाशिकमधील मध्यवर्ती ठिकाण असून तेथे दाट लोकसंख्या आहे.स्लम एरिया जास्त आहे आणि क्रिमिनल केसेस सुद्धा जास्त आहेत.ह्या अगोदर योगेश आणि त्याच्या मित्रांवर किरकोळ स्वरूपाच्या काही केसेस होत्या.(एरियात झालेल्या मारामाऱ्या वैगेरे) ह्या सर्व गोष्टी पाहता आणि घटनेची सुरुवात बघता लक्षात येते की योगेश आणि त्याच्या मित्रांना ठरवून तर नाही ना गुन्हेगार बनवले..?
तसे पाहिले तर केलेल्या गुन्ह्याची सजा योगेश आणि त्याचे मित्र भोगून आले होते.गुन्हेगाराचे पुनर्वसन करणे ही न्यायिक भूमिका असायला पाहिजे पण ईथे सामान्य माणसाला गुन्हेगार करण्याची प्लॅनिंग झालेलं दिसते.हे प्रकरण सागर हजारे ह्यांनी एपीआय.एस.एस.वराडे ह्यांच्याकडे गेले आणि बदल्याच्या भावनेने योगेश हिवाळे आणि त्याच्या साथीदारांच्या आयुष्याचे धिंडवडे निघाले.
घरात हत्यारे ठेवून त्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न
वेगवेगळ्या छोट्या,मोठ्या प्रकरणात योगेश हिवाळेचे नाव टाकण्याचे कटकारस्थान गेल्या दीड वर्षात झालेले दिसते सात ते आठ केस योगेशवर नोंद झालेल्या दिसतात.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी,त्याच्या घरात हत्यारे ठेवून त्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न झाला होता असे योगेशचा भाऊ,कुटुंबातील व्यक्ती,व शेजारी सांगत होते.त्याची व मित्रांची तडीपारी सुद्धा काढली होती.ह्या सर्वांपेक्षा भयंकर म्हणजे रोजच्या रोज होणारं टॉर्चरींग.
रात्री अपरात्री पोलिसांचा ताफा येणं,घरात झडती घेणं,धमकावनं,मारणं, केस टाकतो,फोडतो,बघतो अशी भाषा वापरनं…!
हे सर्व योगेशला असह्य झालं होतं,हे एकंदरीत त्याच्या व्हिडीओत आपल्याला दिसलं आहे.शेवटी त्याने वराडे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलीच.?आत्महत्या नव्हे तर संस्थानिक हत्या,भद्रकाली पोलिस ठाण्याकडून झालेली संस्थानिक हत्या,एस.एस.वराडे कडून झालेली हत्या…?
एस.एस.वराडे ह्यांचे ह्या प्रकरणाच्या निमित्ताने समोर आलेले काही कारनामे पाहिले तर किती अमानुष आणि क्रूरता भरलेली असेल ह्या माणसात हे लक्षात येते.शोभा खरात नावाच्या महिलेचे घरगुती भांडण झाल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेले जाते व तिथे महिला पोलीस कॉन्स्टेबल असताना सुद्धा,स्वतः API पदावरची व्यक्ती पट्टयाने त्या महिलेला मारते…!
महिलेला अर्वाच्य शिव्या देऊन जातिवाचक बोलतो,बघू तुझ्या भीम बाबाचा कायदा..?
त्या महिलेला अर्वाच्य शिव्या देऊन जातिवाचक बोलतो,बघू तुझ्या भीम बाबाचा कायदा..?
(ज्या कायद्यामुळे हे तिथे बसले आहेत त्याचीच विटंबना) सपना ढगे ह्या मुलीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न एस.एस.वराडे करतात
पण सपनाची आई,शोभा खरात ह्या त्यांना रिक्वेस्ट करतात की तिचे सिझर झाले आहे मारू नका तरी तिला उठ बश्या काढायला सांगतात..!
काय ती क्रूरता.?
8 महिन्यापूर्वी रोहित सोळसे नावाच्या तरुणाला एका भांडणाच्या प्रकरणात कस्टडीमध्ये घेतात
आणि न पाहिलेल्या गुन्ह्याचा त्याला साक्षीदार करण्याचा प्रयत्न करतात,
आणि अक्षरशः २ दिवस त्याचं रिमांड घेतात.त्याची आत्या सांगते एव्हडे गुरा ढोरांसारखं मारतात की
त्याला चालता येत नाही त्यानंतर सुद्धा त्याच्या ४३ वर्षीय वडिल – ज्ञानेश्वर सोळसे ह्यांना म्हणतात,
हे तर काहीच नाही,ढोल- ताश्या आणा आता ह्याची अजून वरात काढतो…!
कुठल्या बापाला आपल्या लेकरावर झालेले अमानुष अत्याचार पाहवतील .?
कुठल्या बापाला आपल्या लेकरावर झालेले अमानुष अत्याचार पाहवतील?
आणि हे अत्याचार बघून असह्य होऊन बापालाच (ज्ञानेश्वर सोळसे ह्यांना) अटॅक येतो
आणि एस.एस.वराडे साहेबांमुळे झालेल्या हत्येला कोरोनाचे नाव देऊन प्रकरण संपविण्यात येते..
योगेशचा मृत्यू झाल्यानंतर भीमवाडीत येऊन म्हणतात की,हे प्रकरण बाहेर गेलं तर तुम्हाला महागात पडेल..?
ह्याचा काय अर्थ घ्यायचा प्रशासनाचा..!
नाशिक मधील विशेषतः भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये हा जो प्रकार चालला आहे,
प्रत्येक झोपडपट्टीतील व्यक्ती हा आरोपी/गुन्हेगार असतो अशी धारणा प्रशासनाने केली आहे ती अत्यंत भिकार आहे.ह्या सर्वांचा जाहीर निषेध.
सर्व दोषी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व भविष्यात कुठल्या योगेश हिवाळेची हत्या होवू नये हेच अपेक्षित.
ह्या प्रकरणाचा पाठपुरावा व न्याय देण्याचा सद्भावनेने वेगवेगळ्या संघटना मदत करत आहेत,
ह्या वेळी मा.नितीनजी काळे साहेब आणि रवी आहिरे सर मानवाधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.सोबत मी ही होतो.
कुठल्याही मेन स्ट्रीम मिडियातील पत्रकाराला वाटले नाही की ह्या प्रकरणाचा फॅक्ट फायडिंग रिपोर्ट बनवावा,जसा पूजा चव्हाणचा बनवत आहेत.ही अतिशय नीच व्यवस्था असून खरा निषेध ह्यांचाच आहे.जे ही मांडले आहे त्याचे एव्हीडन्स म्हणून व्हिडीओ काढलेले आहेत तसेच ज्यांना कुणाला प्रकरणाची सखोल माहिती हवी असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची इच्छा असेल तर खालील क्रमांकावर संपर्क करावा.मी फक्त शब्द रचना केली असून कुणीतरी करणे गरजेचे होते हाच एक हेतू.
(आयु.धुराजी हिवाळे (कालकथीत योगेशचे वडील) 8432277127)
हे ही वाचा.. अँटिलिया केस : स्फोटके ठेवलेल्या कार चे मालक मनसुख हिरेन चा मृतदेह खाडीत सापडून आला
First Published on March 06, 2021, 11:00 AM
WebTitle – Yogesh hivale suicide case Nasik