कोणे एकेकाळी एका गावात एक सुमारबुद्धी गरीब बोकील रहात होता.
बालबोकील शालेय जीवनात खूप खोडकर होता.शेंगा खाऊन त्याची टरफले तो मुलांच्या दफ्तरात टाकत असे.गुर्जी सर्वांना उभे करत मग बालबोकील म्हणत असे मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी काजू खातो गुर्जी.आमच्या गावी काजूची बाग आहे. मग याच्याऐवजी एखाद्या गरीबाला फटके मिळत.बालबोकील मार खाणाऱ्या गरीबाकडे तिरक्या नजरेने पहात छद्मी हसत असे.
प्रत्येकाला बोकील विषयी असूया वाटू लागली.
बालबोकीलचे मराठी संस्कृत फार उच्चकोटीचे होते.
ललित लेखन प्रकारात त्यास विशेष रस अन गती होती.
तो एकाच वेळी अनेक गूढ रंजक कथांची सरमिसळ करून समोरच्या श्रोतृवर्गाला मंत्रमुग्ध करत असे.
शाळेत वत्कृत्वस्पर्धेत त्याने प्रत्येक वर्षी बक्षीस पटकावले होते.
बालबोकीलला गाड्यांची खेळणी साठविण्याचा छंद होता.
बाबांकडे हट्ट करून तो कुंभाराकडून अशी खेळणी बनवून घेत असे.
घराच्या अंगणात मग रेषा मारून रस्ता आखत असे.
त्यांना द्रुतगतीमार्ग बायपास वगैरे नावांचे बोर्ड तो स्वत:च रंगवी.
अन सोबतीच्या सवंगड्यांना घेऊन तो अर्थभ्रांती ऑन एक्स्प्रेस हायवे खेळत असे.
बालबोकीलला डॉक्टर डॉक्टर खेळायचाही नाद होता.
एका मित्राला झोपवून तो रक्तविरहीत शस्त्रक्रिया कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवी..
त्याच्या पोटात गुच्च्या मारी त्याला अर्धमेला केला की शस्त्रक्रिया यशस्वी झाली असे म्हणत टाळ्या वाजवी.मग इतर मुलेही तसेच करत.
फर्ग्युसन महाविद्यालयात असताना तरुणबोकील निसर्गनियमानुसार एका सुंदर युवतीच्या प्रेमात पडला.
युवती अशी देखणी कमनीयबांध्याची आरस्पानी सौंदर्याची खाण.तरुणबोकीलही काही कमी नव्हता.
शिडशीडीत आणि सुसंस्कृत अन विशेष म्हणजे अतीप्रामाणिक.
अधेमधे गोष्टी रंगवून सांगण्याची हातोटी त्यामुळे या गुणांवर कुणी भाळली नाही असे कसे असे कसे?
ही दोघेही कॉलेजात फेमस झाली.प्रत्येकाला बोकील विषयी असूया वाटू लागली.
दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली.तीच्या घरून विरोध होता.म्हणून यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न करण्याचा मार्ग निवडला.
त्यादिवशी तरुणबोकीलने ट्रंकेतला आवडीचा पिवळटराखाडी कोट
ज्याला कांजी करून घडी मारून ठेवून दिलेला तो घातला.
कोल्हापुरी चपलेला खोबरेल तेल चोळून चमकविले.
थोडी स्नोपाउडर थापली अन अंगावर गुलाबपाणी शिंपडून स्वारी कॅन्टीनमध्ये दाखल झाली.
आई त्याला लाडाने बोकू म्हणत असे
हे सर्व तरुणबोकीलची आई कौतुकाने बघत होती.आपला चिरंजीव आता वयात आला याची जाणीव त्या माऊलीला झाली.बाळां बोकू..कपडे एवढे जपतोस तसे चारित्र्याला घाण लागू नये म्हणूनही जप हो..अन कुणी असेल तर आम्हाला सांगावं,तुला जे पसंत असेल तेच होईल हो..” त्यावेळी बोकू म्हणजे आपला तरुणबोकील (आई त्याला लाडाने बोकू म्हणत असे)एवढा लाजून चूर झाला की चप्पल पायात सरकवता सरकवता धडपडून पडला असता तसाच धडपडत तो आईच्या पायाशी आला अन चरणस्पर्श करत आशिर्वाद दे माते..
असे म्हणून अभिमान गर्वाने तिच्याकडे पाहू लागला.
आईनेही मायेने त्याच्या मोठ्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला
अन कानाजवळ बोटे ठेवून ती कडाक्कन मोडली.
तरुणबोकीलचा प्रेमावरचा विश्वास उडाला.
तरुणबोकील ठरल्याप्रमाणे चितळेकॅन्टीनमध्ये बराचवेळ बसला तोपर्यंत त्याने दोनतीन मस्तानी लस्सी एकट्यानेच संपविल्या.नंतर करपट ढेकरं यायला लागल्यावर त्याने ते थांबवलं.बराचवेळ वाट पाहूनही ती न आल्याने बोकील निराश झाला.दुसऱ्या दिवशी त्याला मित्रांकडून समजलं की आपली लैला दुसऱ्याच बाजीरावासोबत उडन छू झाली.तरुणबोकीलचा प्रेमावरचा विश्वास उडाला.
त्यानंतर कधीच प्रेम करायचं नाही असं त्याने ठरवलं.तो एकटा एकटा राहू लागला.शिक्षण थांबलं.नोकरीही करावीशी वाटेना.त्यामुळे त्याला आईच्या पेन्शनवरच अवलंबून रहावं लागत असे.एव्हाना विचार करून करून डोक्यावरील केस साथ सोडू लागले होते.टक्कल अर्धेअधिक दिसू लागले.एक दिवस मित्राने अर्धचंद्रबोकीलला सवाईगंधर्व कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले.इच्छा नसताना तो तीथे गेला.तर त्याची लैला दोन मुले एक कमरेला एक हाताशी अशी येताना दिसली.सोबत एक देखणा उमदा मध्यमवयीन गृहस्थ.काय समजायचे ते अर्धचंद्रबोकील समजला.तीचा नवरा मुलांना शौचालयात घेऊन गेला.
हि संधी साधत अर्धचंद्रबोकील आपल्याला फसविल्याचा जाब विचारण्यासाठी तीला एकटीला गाठले.जाब विचारताच.लैला फणकाऱ्याने म्हणाली.तूझ्या सारख्या दरिद्री माणसाशी कोण लग्न करणार? खिशात दमडी नसते ना तुझं बँक खातं आहे.प्रेम काही पोटाची भूक भागवत नाही.खायचं काय माती? तू स्वत: आईच्या पेन्शवर जगतोस माझं काय?
अर्धचंद्रबोकीलला हे जिव्हारी लागलं.तो प्रचंड दुखावला.त्याने त्याक्षणी भीष्मप्रतिज्ञा केली.सारी पृथ्वी निरोकड करणार रोकडरहित म्हणजे कॅशलेस करणार आणि संसारी लोकांना त्रास देवून माझ्या एकलेपणाचा सड्यापणाचा प्रतिशोध घेणार.
त्याने लगोलग आपल्यासारखे काही रिकामचोट बुणगे गोळा केले.अर्थभ्रांती नावाने एक मंडळ स्थापन केले.देशाचे नेतृत्व करणाऱ्यास आपले म्हणने पटावे आणि त्यांनी समस्त देशवासीय पृथ्वीवासियांना त्यासाठी मजबूर करावे म्हणून त्यांनी परधानमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले.
नोटबंदी
परधानमंत्री त्याच टोळीतला रिकामटेकडा माणूस,नुसता गावभर देशविदेशात चकाट्या पिटत हिंडणे.सानुनासिक साभिनयाद्वारे ज्या समाजात जाईल त्या समाजातील महापुरुषांसारखे मला लहानपणापासून हे बनायचं होतं.ते बनायचं होतं हिरो बनायचं होतं व्हिलन बनायचं होतं असे लोकांत जावून सांगणे.रडणे हसणे सेल्फ्या फोटू काढणे इत्यादी मनोरंजनाचे प्रकार हा परधानमंत्री करत असे.
त्याला हा नंबरी इसम भेटला,
परधानमंत्री लगोलग आपल्या अर्थमंत्र्याला बाजूला घेऊन बोललो..
“व्हयं वो आरुनभौ..द्यीव या का ह्यास्नी येळ? करू थोडा खेळ
तसं बी आता काय काम सूचना सगळं देश फिरून झालं नुसता कटाळा आलाय.आता जरा कायतरी तुफानी झालं पायजे गड्या..”
अरूनलाही काय काम उरलेलं नव्हतं.तर म्हणाला चला हायकाय अन नायकाय.
मग रातोरात केली बेट्यांनी नोटबंदी कॅशलेस होण्याच्या सूचना केल्या.
त्याअगोदर आपला सगळा काळापैसा पांढरा करून घेतला
यातील काही मूर्ख नेते पोलिसांच्या हाती सापडले.अळीमिळी गुपचिळी झाली.
अर्धचंद्रबोकील समस्त संसारी लोकांवर सूड उगवला म्हणून मनोमन खुश झाला.
अनेक गरीब नुसत्या घोषणेच्या धक्क्याने मरून गेले.
मग तिघांनी माध्यमांच्या समोर येवून ते कसं गरजेचे होतं अशी सारवासारव करायला सुरुवात केली.
भ्रष्टाचार दहशतवाद मिटविण्यासाठी मोठा नोटा बंद केल्या पाहिजेत असे म्हणायला सुरुवात केली.
अन त्यापेक्षा मोठी दोन ह्ज्जाराची नोट काढली.लोक भडकले.संयम सुटत चालला.
परधानमंत्र्याने नामी शक्कल लढवली थोडासा रडला अन म्हणाला पन्नास दिवसात सगळं सुरुळीत करतो का नाय बघाच.
मी हाय बोकील वाट्टेल ते ठोकील
नाय तर मला जाळा (ह्याला कुणी जाळणार नाही हे यालाही माहित होतं पण तसं,म्हणायला काय जातंय?)
पन्नास दिवस अजून पूर्णच झालेले नाहीत अरुनभौ ने दुसरे आर्थिक गणितं मांडून लोकांना आणखी पेचात टाकलं अर्धचंद्रबोकील आता अर्थ तज्ज्ञ बोकील म्हणून प्रसिद्ध झाले.त्यांनी दिलेल्या आयडियाच्या कल्पनेबद्दल त्यांना भारतरत्न देवून परधानमंत्र्यानी गौरव केला.
अशा तऱ्हेने आणखी एक अजोड रत्न भारताला मिळालं.
८ नोव्हेंबर हा जागतिक नोटबंदी बोकील डे म्हणून साजरा करण्याचे नासाने मान्य केले.
“मी हाय बोकील वाट्टेल ते ठोकील” हे ब्रीदवाक्य प्रसिद्ध झालं.
22 February 2017
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)