२५ दिसंबर १९२७ को डॉ. बी. आर. अंबेडकर और उनके अनुयायियों ने, किस धर्मग्रंथ की प्रतियाँ जलाई थी ? हा महानायक अमिताभ बच्चन यांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी, कौन बनेगा करोडपती’मध्ये ₹ ६,४०,०००/- साठी विचारलेला प्रश्न.. विषमता, जातीयता, निर्दयता, उचनिचता, अन्याय अत्याचार अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या कुप्रसिद्ध मनुस्मृती ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड क्रांतीभूमीत मुठमाती दिली होती,मनुस्मृतीचे जाहिर दहन केले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मानवी उत्कर्षाची मुल्ये ज्या मनुस्मृतीत नाहित, तो मनुस्मृती ग्रंथ जाळल्या प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्याबद्दल कोणाच्या भावना का दुखावतील ? अन् अमिताभ बच्चन यांनी माफी तरी का मागावी ? महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्राी विलासराव देशमुख यांनी तर मनुस्मृती ग्रंथावर बंदी घातली होती.
संविधानांने भारताचे अखंडत्व राखले आहे
मनुस्मृती शुद्र जातींची निंदा करणारी असून, त्यांचा उपमर्द, अनादर करणारी, मानव जातीला कलंक अन् माणसात भेदभाव करुन, माणूस म्हणून माणसाला नाकारणाऱ्या मनुस्मृती ग्रंथ जाळल्या प्रकरणी प्रश्न विचारला म्हणून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मनुची मानसिकता आजही अस्तित्त्वात आहे हि संविधानाचा पुरस्कार करणाऱ्या भारत देशासाठी नक्कीचं अभिमानास्पद नसून, ती घोर निंदनीय बाब आहे. कारण, प्रत्येक वर्णाने कसं रहावं, कस जगावं, विद्येचा – ज्ञानप्राप्तीचा, धनसंचयाचा अधिकार कोणाला असावा अशी समाज रचना करुन, स्त्रीयांना भोगवस्तू म्हणून आत्यंतिक हीन दर्जा देणारा विषमतावादी, अमानुष, समाजद्रोही मनुस्मृती ग्रंथाचे आम्ही कदापी समर्थन करणार नाहीत.
आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर
देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले
म्हणून आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे याचा भारतीय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे होता.
आपल्या देशात अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था असतांनाही
संविधानांने भारताचे अखंडत्व राखले आहे याचा मनुस्मृतीचा पुळका, समर्थन करणाऱ्यांनी थोडा तरी विचार करायला पाहिजे.
मनुस्मृतीचे दहन झाले तरी मनुची मानसिकता जीवंत आहे
मध्यंतरी संभाजी भिडेंनी तर मनु हा जगातील पहिला कायदे पंडित,बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा अभ्यास करुन संविधान लिहिले, बाबासाहेबांनी मनुचे कौतुक केले अशी बिनडोक बेताल वक्तव्ये अन् खोडसाळपणा केला होता. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता हि मुल्ये ज्या मनुस्मृतीत नाहित तिचे समर्थन बाबासाहेब का करतील ? त्यामुळे मनुस्मृती ग्रंथाच्या माध्यमातून लोकांना भावनिक बनवून, विषमतावादी मुल्यांचे समर्थन करणे म्हणजे मानवतेचं अवमुल्यन आहे.
by – मिलिंद कांबळे चिंचवलकर
लेखक आंबेडकरी चळवळ अभ्यासक आहेत.
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)