घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार दारा सिंह चौहान यांच्यावर शाई फेकणाऱ्या तरुणाने आत्मसमर्पण केले आहे.हा तरुण कोपगंज पोलीस ठाण्यात शरण आला आहे. आत्मसमर्पण केलेल्या तरुणाने हा भाजपचाच प्लॅन असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या एका नेत्याने त्याला शाई फेकण्यास सांगितले. अभिमन्यू उर्फ मोनू यादव उर्फ डायमंड असं या तरुणाचे नाव आहे.

भाजप जिल्हाध्यक्षांचा सपावर थेट हल्लाबोल
या घटनेनंतर लगेचच दारा सिंह चौहान कोणताही कार्यक्रम न करता परत गेले. या घटनेबाबत पत्रकारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गुप्ता यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, “त्यावेळी संघटनेच्या बैठकीत त्यांना या घटनेची माहिती मिळाली.त्यानंतर समाजवादी पक्षाने पुरस्कृत केलेल्या गुंडांनी हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने चौकशी केली जात आहे. लवकरच दोषीही पकडले जातील आणि जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”
भाजपा नेते दारा सिंह चौहान सुध्दा माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही विजयी होणार आहोत म्हणून विरोधक घाबरले असून या भीतीमुळेच त्यांनी हे कृत्य केलं आहे.
शाईफेक करणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये मोनू यादव पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करणार असल्याचे बोलत असून वाटेत कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवत आहे.
यावेळी तो म्हणाला की, हा सगळा प्लॅन भाजपचाच होता,असं करण्यास मला एका भाजप नेत्यानेच सांगितलं होतं.
शाई फेकणाऱ्या तरुणाने सांगितले, भाजप नेते राजकुमार यादव म्हणाले की, आपली इथली निवडणूक फसत चालली आहे. तू जर शाई फेकली तर आपल्याला लोकांची सहानुभूती मिळेल,तुला यातून आम्ही सहीसलामत सोडवू.
सध्या आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र पोलिसही याबाबत अधिक माहिती देत नाहीत,असे समजते.
सत्य समोर आल्याने भाजपची किरकिरी
रविवारी भाजपचे उमेदवार दारा सिंह हे त्यांच्या मतदारसंघात पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचार करत असताना
त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.सुरक्षा कर्मचारी असतानाही आरोपी गुन्हा करून फरार झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.मात्र आता या घटनेला वेगळीच कलाटणी मिळाली असून
वेगळेच सत्य समोर आल्याने भाजपची किरकिरी व्हायला लागली आहे.
दारा सिंह चौहान एका निवडणूक रॅलीला संबोधित केल्यानंतर दुसऱ्या सभेला संबोधित करणार होते.
त्यामुळे आद्री नगर पंचायतीत त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले कार्यकर्ते पाहून ते थांबले,
नुकतेच ते गाडीतून उतरत असताना दारा चौहान मुर्दाबादच्या घोषणा देत काही अराजकवादी घटकांनी त्यांच्यावर काळी शाई फेकली.
अशा बातम्या मिडियात आल्या होत्या.
शाई फेकण्याचे हे कृत्य घडले तेव्हा दारा सिंह चौहान यांचे सुरक्षा रक्षकही तेथे उपस्थित होते, परंतु त्यांना काहीही समजेपर्यंत शाई फेकणारा बेपत्ता झाला होता. तेथे उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.मात्र आता या घटनेला वेगळीच कलाटणी मिळाली असून वेगळेच सत्य समोर आल्याने भाजपची किरकिरी व्हायला लागली आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 21,2023 | 11:50 AM
WebTitle – Alleged Youth Accuses BJP Leader of Involvement in Dara Singh Chauhan Ink Attack