“जय भीम” या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.हा पहिला सिनेमा असू शकतो ज्याने प्रांत धर्म जात भाषा या सर्व अडचणी दूर करत सर्वांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलं आहे.यातील सर्वच अभिनेत्यांचा ताकदीचा अभिनय, दिग्दर्शकाने कौशल्याने दिग्दर्शित केलेले प्रसंग आणि अॅक्शन डायरेक्टर व सिनेमॅटोग्राफर यांनी अमानवीय कृतीचे दर्शन घडविणारे चित्रित केलेले सर्व प्रसंग पाहताना अंगावर काटे उभे राहतात.जय भीम ही फिल्म आदिवासी जमातीवर आधारित असून राजकन्नू आणि त्याची पत्नी पार्वती यांच्या जीवनावर आधारित आहे.
हा सिनेमा जसा भारतात गाजतो आहे तसाच परदेशात ही गाजतो आहे.जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते. जगातील सर्व सिनेमानं येथे मानांकन मिळते. त्यांना रेटिंग दिले जाते. जगातील एक हजार मुव्ही तपासल्या तर 9.6 रेटिंग घेऊन जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर आहे तर 1984 वर्षाचा हॉलिवूड मुव्ही The Shawshank Redemption हा 9.3 रेटिंग घेऊन दुसऱ्या नंबर वर आहे.
अभिनेता सूर्याची एक कोटीची मदत
जय भीम चित्रपटाचा अभिनेता सुरिया आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री ज्योतिका यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेऊन सुरिया आणि ज्योतिकाच्या 2D एंटरटेनमेंटच्या वतीने इरुलर समुदायाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तब्बल 1 कोटी मदत निधी दिला.
चित्रपटाचे आणि सुर्याच्या उदार भावनेचे कौतुक करताना मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले की, “काल जय भीम चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या आठवणींनी मी रात्रभर जड अंतःकरणाने भारून गेलो होतो.. तुम्ही लोकांनी सिद्ध केले आहे की इरुलर समुदायाला सामोरे जावे लागलेल्या संघर्षांचे चित्रण चित्रपटातून प्रभावीपणे मांडणे यापेक्षा चांगला मार्ग नाही हा चित्रपट एका विशिष्ट घटनेवर आधारित असला तरी त्याचा प्रेक्षकांवर झालेला प्रभाव जबरदस्त आहे.”
अभिनेता, दिग्दर्शक राघव लॉरेन्सने घोषणा केली की तो पार्वतीसाठी घर बांधणार आहे
अभिनेता, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक राघव लॉरेन्सने घोषणा केली आहे की तो पार्वतीसाठी घर बांधणार आहे, अलीकडील तमिळ चित्रपट जय भीम पाहून त्याला प्रेरणा मिळाली. तो अंतर्मुख झाला.आतून हलला.समीक्षकांची प्रशंसा मिळविलेल्या या जय भीम फिल्म मध्ये सेंगनी (पार्वती वर आधारित कॅरेक्टर ) आणि वकील चंद्रू (अभिनेता सूर्या) यांच्या दमदार अभिनयाद्वारे ऐतिहासिक कायदेशीर लढाईची गोष्ट सांगितली आहे, तिचा पती राजकन्नू, जो इरुलर जमातीचा आहे, याला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पोलिस कोठडीत अनन्वित अत्याचार केलेले असतात.
“राजकन्नूची पत्नी पार्वती अम्मा हिच्या वास्तव जीवनाबद्दल मला समजले तेव्हा मला खूप त्रास झाला,
तिच्या पतीला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी छळ करून ठार मारण्यात आले,” असं लॉरेन्सने एका चिठ्ठीत लिहिलं आहे.
लॉरेन्सने सांगितले की, पार्वतीच्या सध्याच्या गरिबीच्या स्थितीबद्दल अधिक तपशील ऐकून तो खूप अस्वस्थ झाला होता, एका YouTube चॅनेलने Valaipechu Voice यावर पार्वती यांची मुलाखत पाहिली तेव्हा. “मी पार्वती अम्मा यांना वचन दिले आहे की मी माझ्या खर्चाने त्यांच्यासाठी घर बांधीन,” असं लॉरेन्सने पुढे लिहिले.
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 10, 2021 11:03 AM
WebTitle – After watching the movie “Jai Bhim”, the actor decided to give a house for “Parvati”