मुस्लिम व्यावसायिकाला लव्ह जिहाद मध्ये अडकवण्यासाठी महिलेला केलं हायर,यूपीच्या कासगंजमध्ये, उजव्या विचारसरणीच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांनी बलात्काराच्या प्रकरणावरून गंजदुंडवाडा पोलीस ठाण्यात निदर्शने केली होती. या आंदोलनात अमन चौहान आणि आकाश सोलंकी नावाचे दोन लोक मुख्य भूमिकेत होते. आता याच प्रकरणात आरोप करणाऱ्या महिलेने उलटा आरोप केला आहे की, या दोघांनी मुस्लिम व्यावसायिकाला बनावट लव्ह जिहादच्या प्रकरणात अडकविण्यासाठी मला हायर केले होते.
दिल्लीतील महिलेचा खुलासा
या प्रकरणात राधा (२४) (काल्पनिक नाव) नावाच्या दिल्लीस्थित हिंदू महिलेने या दोघांवर (अमन चौहान आणि आकाश सोलंकी) कासगंज, यूपी येथील २७ वर्षीय मुस्लिम व्यावसायिकाला बलात्कार आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात फसवल्याचा आरोप केला आहे. यासाठी मला कामावर ठेवलं होतं म्हणजे “हायर केलेले” होतं. TOI च्या वृत्तानुसार, यातील एक आरोपी म्हणजेच अमन चौहान याने त्याच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये स्वतःला भाजप युवा विंगचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ओळख जाहीर केली आहे.
मुस्लिम व्यावसायिकाला लव्ह जिहाद मध्ये अडकवण्यासाठी महिलेला केलं हायर
राधा या २४ वर्षीय महिलेने यापूर्वी प्रिन्स कुरेशीवर स्वत:ला ‘मोनू गुप्ता’ म्हणून प्रोजेक्ट केल्याचा आरोप केला होता.
व्यावसायिकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला होता.
महिलेच्या तक्रारीनंतर, 16 जुलै रोजी कुरेशी विरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे)
आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तुरुंगात जाण्याच्या भीतीने घाबरली महिला
या प्रकरणात, महिलेने सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकार्यांसमोर जबाब नोंदवताना सांगितले की,
तिला अमन चौहान आणि आकाश सोळंकी यांनी या कामासाठी ठेवले होते.
या प्रकरणात, असे मानले जाते की महिलेला न्यायालयाने सांगितले की तिची वैद्यकीय तपसणी केली जाईल,
त्यात तथ्य आढळले नाही आणि तिची तक्रार खोटी असल्याचे आढळल्यास तिला तुरुंगात जावे लागू शकते.
या प्रकरणी चौहान, सोलंकी आणि राधा यांच्यावर पोलिसांनी नंतर गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.
तत्पूर्वी, चौहान आणि सोळंकी यांनी उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांसह
गंजदुंडवाडा पोलिस स्टेशनमध्ये या तथाकथित “बलात्कार” प्रकरणी आंदोलन केले.
एसपी म्हणाले- महिलेने कबुली दिली
कासगंज पोलिसांचे एसपी बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितले की, “महिलेने आरोपांसह केलेल्या वक्तव्यातील सर्व तथ्य खोटे असल्याचे आढळून आले आहे. एसपीच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान महिला वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाली नाही.त्यानंतर तीने कबूल केले आणि सांगितले की तीला तसे करण्यास सांगितले गेले होते. एसपीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण दोन स्थानिकांमधील असल्याचे दिसते, ज्यांच्यामध्ये काही जुन्या वैमनस्याची मुद्दाही समोर आला आहे.
भाजपने हात झटकले
एसएचओ अनूप कुमार भारती म्हणाले, “दोन जणांना अटक करण्यात आली होती पण नंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. एसएचओच्या म्हणण्यानुसार ते लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहेत. अमन चौहान हे भाजपचे कार्यकर्ते नसून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष केपी सिंह यांनी म्हटले आहे. ते आकाश सोळंकी यांना ओळखत नाहीत आणि भाजपचाही या प्रकरणाशी काही संबंध नाही.
चीन पाकिस्तान लष्करासाठी बंकर बनवतोय,सुरक्षा यंत्रणांचा सरकारला इशारा
संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटविण्याची माजी जदयू नेत्याची मागणी
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 24, 2022, 16:48 PM
WebTitle – A woman was hired to trap a Muslim businessman in love jihad