खरगपूर – सोमवारी ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला ज्याने सर्वांना धक्का बसला.आयआयटी खरगपूरच्या भारतीय प्रीमियम अभियांत्रिकी संस्थेच्या ऑनलाईन शिकवणूकीत एक विकृत जातीयवादी महिला शिक्षक सीमा सिंह या ऑनलाइन वर्ग घेताना विद्यार्थ्यांना अतिशय गलीच्छ शब्दांत ओरडताना दिसून आल्या.
हा व्हिडिओ सोशल मिडियात वायरल झाल्यावर ट्विटरवर याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली.अनेक नागरिकांनी याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून ते शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यापर्यंत ही गोष्ट नेत त्यांना व्हिडिओ टॅग करून या विकृत जातीयवादी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रकरण तापल्याने अखेर या विकृत जातीयवादी महिला शिक्षक सीमा सिंह यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
विकृत जातीयवादी महिला शिक्षक सीमा सिंह या आईआईटी खरगपुर येथे मानवी आणि सामाजिक विज्ञान च्या एसोसिएट प्रोफेसर आहेत.
आपण म्हणाल की अभियांत्रिकी महाविद्यालयात मानवता आणि सामाजिक विज्ञानाच्या अनुषंगाने इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना असा कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो?
वास्तविक, एससी-एसटी आणि दिव्यांग अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक आयआयटीमध्ये असे वर्ग घेतले जातात.
भाषेसह सामाजिक विज्ञान देखील या वर्गांमध्ये शिकवले जाते.
या वर्गाचे उद्दीष्ट हे आहे की कमकुवत कमजोर पार्श्वभूमीतून आलेला कोणताही विद्यार्थी इतरांच्या तुलनेत मागे राहू नये.
हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमास लहान लहान गांव खेड्यातील विद्यार्थी प्रामुख्याने असतात.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर,लोक म्हणत आहेत की ज्या वर्गात असे शिक्षक शिकवतात, तिथे विद्यार्थी कसे काय घडू शकतात?
ऑनलाईन क्लास मध्ये नेमकं काय म्हणाल्या विकृत जातीयवादी महिला शिक्षक सीमा सिंह
विकृत जातीयवादी महिला शिक्षक सीमा सिंह सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या
“तुम्ही आपल्या देशासाठी किमान हे करू शकता. जर तुम्ही वर्गातून बाहेर पडत नसाल तर मी तुम्हाला शून्य गुण देईन. माझ्याकडे तुमच्यासाठी 20 गुण आहेत, जर तुम्ही वर्ग सोडला नाही तर तुम्हा सर्व 120 लोकांना शून्य गुण देईन.
राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ तुम्हाला केवळ दोन मिनिटे उभे राहावे लागेल आणि हे आपण करू शकत नाही का? तुम्ही xxx xxx , हे तुमच्या पालकांसाठी देखील आहे.त्यांना काही लाज आहे का? तुम्ही शाळेत आहात का? xxxx xxx..”
विद्यार्थ्यांना घाबरवत धमकावण्याचे उद्योग
एवढेच नाही तर त्या काय करत आहेत याची त्यांना व्यवस्थित कल्पना होती आणि त्यामुळे त्या असंही म्हणाल्या की “मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही,तुम्ही मला ओळखत नाही,तुम्ही कोणत्याही मंत्र्याकडे जा,अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जा,मला काहीच फरक पडणार नाही मी तुम्हाला नापास करेन, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना घाबरवत धमकावण्याचे उद्योग या विकृत जातीयवादी महिला शिक्षकाने केले आहेत.
या सर्व प्रतापाने शिक्षण क्षेत्रातील सुप्त आणि स्पष्ट असलेला जातीयवाद उफाळून समोर आला आहे. त्यातही महिला शिक्षिका अशा मानसिकतेच्या असल्याचे चित्र समोर आल्याने अशा शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान हे प्रकार प्रचंड तापल्याने अनेक नेत्यांनी यात उडी घेतली आहे.यासोबतच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या विकृत जातीयवादी महिला शिक्षक सीमा सिंह यांच्यावर अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना ; खरगपूर विद्यापीठाचे कुलगुरू व पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे.
एकीकडे कोरोना महामारीचा कहर त्यात अभ्यासाचा तनाव दुसरीकडे शिक्षणसारख्या पवित्र ठिकाणी जातीयवादी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे होणारे शोषण अपमान आणि त्यातून नैराश्यग्रस्त होत विद्यार्थी आत्महत्या करतात.त्यामुळे अशा विकृत अमानवी लोकाना शिक्षणसारख्या विद्यार्थी आणि एक निरोगी सुधृढ समाज घडवणाऱ्या क्षेत्रात एक क्षणभर सुद्धा असता कामानये.
समाजासाठी असे शिक्षक धोकादायक असतात.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 28, 2021 11: 48 AM
WebTitle – A racist teacher Seema Singh has been charged with abusing a student in an online class 2021-04-28