आग्रा, उत्तरप्रदेश 16 जून : कोरोना (Coronavirus) महामारीने देशात उच्चांक गाठलेला असताना देशातील अनेक राज्यात धक्कादायक दृश्य पाहायला मिळाली. देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थे कोलमडून गेल्यामुळे या काळात नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागलं.अनेक ठिकाणी बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता.याच काळात उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आगरामधील (Agra) पतीला तोंडानं ऑक्सिजन देणाऱ्या महिलेचा फोटो एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
या फोटोमध्ये एक महिला ऑटोमध्ये बसलेली होती
आणि ती आपल्या पतीला तोंडानं (ऑक्सिजन) श्वास देऊन पतीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती.
महिलेच्या पतीला चार रुग्णालयांनी बेड नसल्याचं सांगत दाखल करून घेण्यास नकार दिला होता.
तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र, प्रचंड धडपड करुनही ही महिला आपल्या पतीला वाचवू शकली नाही.

हा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत महिलेला सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला
हा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत महिलेला सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला मात्र आजपर्यंत कोणीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, की ही महिला नेमकी कोण होती आणि पतीच्या मृत्यूनंतर तिची काय अवस्था आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेचं नाव रेनू सिंघल असं आहे.
रेनू सिंघल यांना एक सोळा वर्षाची मुलगी आहे.तिच्यासोबत त्या आगरामधील आवास विकास कॉलनीतील एका 2,500 रुपये भाडं असणाऱ्या खोलीत राहात आहेत. त्यांची मुलगी सध्या दहावीमध्ये शिकत आहे. रेनू सिंघल यांचे पती पेठा विकण्याचं काम करत होते. एकमेव आधार असणाऱ्या पतीच्या निधनानंतर सध्या रोजच्या खर्चासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. लॉकडाऊनमुळे कुठे नोकरी मिळत नाही. त्यामुळे, कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.असं रेनू सिंघल यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हटलं आहे.
रेनू सिंघल यांनी सांगितलं, की त्यांच्या पतीचं नाव रवी होतं. ते 47 वर्षांचे होते. 20 एप्रिलला त्यांना ताप आला होता.
23 एप्रिलपर्यंत त्यांची प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
तेव्हा त्यांनी ऑटो बोलावली आणि आपल्या पतीला घेऊन त्या जवळच्याच एका रुग्णालयात गेल्या.
मात्र, तिथे त्यांना बेड मिळाला नाही. त्यांना सरोजनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. मात्र, याठिकाणीही त्यांना बेड मिळाला नाही. यानंतर त्यांनी आणखी दोन रुग्णालयांमध्ये प्रयत्न केले मात्र कोणीही रेनू सिंघल यांच्या पतीला दाखल करुन घेतलं नाही. यादरम्यान पतीला श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागल्यानं रेनू सिंघल यांनी आपल्या तोंडानं पतीला श्वास पुरवला. मात्र,त्या आपल्या पतीचा जीव वाचवू शकल्या नाहीत. हा फोटो सोशल मिडियात वायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 16,2021 at 10:45 AM
WebTitle – a-photo-of-a-woman-giving-oxygen-to-her-husband-through-her-mouth-to-save-her-life-had-gone-viral-how-is-the-woman-now-2021-06-16