आर्यन खान ड्रग प्रकरणी एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला अटक करण्यात आली आहे. क्रुझ पार्टी ड्रग प्रकरणी एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. फसवणूक प्रकरणी गोसावी यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.अटकेपूर्वीचा किरण गोसावी चा एक व्हिडिओ समोर आला आहे.2018 च्या फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी लुकआउट परिपत्रक जारी केल्यानंतर फरार झालेल्या गोसावीने महाराष्ट्रात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने किरण गोसावीवर मलेशियामध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
गोसावी नाव बदलून लॉजमध्ये लपून बसला होता
गोसावीच्या अटकेनंतर पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, 2018 च्या फसवणूक प्रकरणात आम्ही आरोपीला पहाटे 3 वाजता एका लॉजमधून अटक केली आहे. गोसावीला पकडण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये पथकांनी छापे टाकले होते. टीम मुंबई, लोणावळा, नवी मुंबई आणि इतर काही शहरांचा सतत शोध घेत होती.बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सचिन पाटील असे भासवून पुण्यातील एका लॉजमध्ये लपून बसल्याचे तपासात समोर आले आहे. तो ‘स्टॉप क्राइम’ नावाची एनजीओही चालवत होता, असेही तपासात समोर आले आहे. त्याने स्वतःला आयात-निर्यात व्यापारी असल्याचे सांगत आहे.
पैसे मागितल्याने जीवे मारण्याची धमकी दिली
मलेशियात काही दिवस राहिल्यानंतर चिन्मय देशमुख कसा तरी पुण्याला परतला, पण परतल्यानंतर गोसावीकडे पैसे मागितल्यावर गोसावीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप चिन्मय देशमुख याने केला आहे. यानंतर चिन्मयने किरणवर गुन्हा दाखल केला, मात्र तेव्हापासून गोसावी फरार होता. आता तो शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत सेल्फी घेऊन पोलिसांच्या नजरेत आला.
किरण गोसावी आपल्या व्हिडिओ मध्ये सांगत आहे की, मी प्रभाकर साईल विषयी काही बोलू इच्छितो,जो काही सांगत आहे की “पैशांच्या देवण-घेवाणवरुन, सॅम डिसोझा सोबत संभाषण कुणाचं संभाषण झालं आहे.किती पैसे कोणी घेतले आहेत. प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत हे त्याच्या मोबाइलवरुन समजेल. प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल चॅट काढावेत. माझे सुद्धा त्याच्यासोबतचे चॅट काढावेत. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे पूर्वीचे काही चॅट्स असतील ज्यात पैशांच्या देवाण-घेवाण बाबत म्हटलं आहे. पण 2 तारखेनंतरचे याचे चॅट्स तपासावेत. मुंबई पोलिसांनी याची चौकशी करावी, डिलिट केलेले चॅट काढावे. याच्या मागे कोण आहे याचीही चौकशी करावी. यांचे फोन रेकॉर्ड्स काढा सर्व गोष्टी समजतील. त्याने केलेले सर्व आरोप खोटे आहेत.”
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 28, 2021 13 :00 PM
WebTitle – A new video came before Kiran Gosavi’s arrest