भाजप नेते गिरीश महाजन सह अन्य २८ लोकांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय CBI ) महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का MCOCA) अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. अपहरण, खंडणी, चोरी आणि इतर आरोपांनुसार सीबीआयने 2020 शी संबंधित गुन्हा दाखल केला आहे.
डिसेंबर 2020 मध्ये विजय पाटील नावाच्या व्यक्तीने पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात भाजप नेते गिरीश महाजन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत धमकावून राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याचे सांगितले होते.
विजय यांनी तक्रारीत म्हटलं होतं की, 2018 ते 2020 या कालावधीत गिरीश महाजन व इतरांनी त्यांना जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले.
वाचकांच्या माहितीसाठी ,मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज ही जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व संस्था चालविणारी सहकारी शैक्षणिक संस्था आहे. संस्थेची एकूण मालमत्ता सुमारे 1,000 कोटी रुपये आहे.
अपहरण करून केली होती मारहाण
इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, विजय पाटील यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की 2018 मध्ये पुण्याला जातेवळी
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील एका फ्लॅटमध्ये त्यांना अपहरण करून नेण्यात आले,
तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच गिरीश महाजन यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दबाव आणि धमकी देण्यात आली होती. यासोबतच आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी धमकीही देण्यात आल्याचा विजय पाटील यांनी आरोप केला आहे.
हे सर्व मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी करण्यात आलं असल्याचं विजय पाटील यांनी म्हटलं आहे.
तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता
जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र सरकारने कोथरूड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली. तपासाअंती, 19 सप्टेंबर रोजी सीबीआयने गिरीश महाजन यांच्यासह तक्रारदाराने आरोपी म्हणून नाव असलेल्या 28 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
गिरीश महाजन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार मध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री होते.ते पाच वेळेस जामनेरचे आमदार राहिले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
“सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता
तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता.
त्या पेन ड्राईव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता.तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आलं होतं.”
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या ‘महासुनावणी’ सुरु,पाहा लाईव्ह
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या..
फॅक्टचेक – न्यूयॉर्क टाइम्स ने मोदींच्या जागी मगरीचा फोटो छापला का?
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on SEP 27,2022, 21:02 PM
WebTitle – a-case-has-been-registered-against-bjp-leader-girish-mahajan-and-other-28-people-under-mcoca