Shivsena Supreme Court Hearing Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर लाईव्ह पाहू शकता.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुद्यावर होणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता जनतेला घरबसल्या थेट पाहता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील कामकाजातलं हे ऐतिहासिक पाऊल म्हणायला हवं,त्याचं स्वागत,यापुढील खटले असेच चालवले जातील अशी तरतूद झाली तर न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
आतापर्यंत काय झालं?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुद्यावर गेल्या एक तासापासून सुनावणी सुरू आहे.या सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्याकडून वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी १९७१ च्या सादिक अली प्रकरणाचा दाखला देण्यात आला. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झाल्यानंतर घटनापीठानं १० मिनिटांचा ब्रेक घेतला आहे.त्यानंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आणि आता लंच ब्रेकसाठी घटनापीठाने कामकाज तहकूब केले आहे.
शिवसेनेची याचिका नेमकी काय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असून शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे,विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदेशीर होते असे मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.
PFI Full Form पीएफआय म्हणजे काय? संघटनेवर कारवाई का केली जात आहे?
fact check भिकारी के रूप में ५०० लोग,किडनी निकाल ले रहे है, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या..
फॅक्टचेक – न्यूयॉर्क टाइम्स ने मोदींच्या जागी मगरीचा फोटो छापला का?
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 27,2022, 13:00 PM
WebTitle – shivsena vs shinde group power struggle in Maharashtra begins, watch the hearing live