खंडवा: ये नया भारत है असं भाजपकडून अभिमानाने बोललं जातं.गेल्या काही वर्षापासून जमावाकडून निष्पाप लोकांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.झटपट न्याय,खुनशी मानसिकता,राग अशा अनेक व्याधीतून हिंस्त्र जमाव गरीब कमजोर लोकांवर तुटून पडत आहे.मॉबलिंचिंग सुरू झाल्यापासून हे प्रकार सगळीकडे सुरू झाले.यातूनच पालघर साधू हत्याकांड देखील घडलं,मात्र अशा घटनांवर सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही,अशीच एक घटना मध्यप्रदेशातील खंडवा येथे घडली असून,प्रेमी समजून भावा-बहिणीला झाडाला बांधून जबर मारहाण करण्यात आली.एक भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी भेटायला आला तेव्हा गावकऱ्यांनी दोघांना झाडाला बांधून सुमारे तासभर चाबकाने फटके मारत अमानुष मारहाण केली. चारित्र्याच्या संशयावरून भाऊ आणि बहिणीला तालिबानी शिक्षा देण्यात आली.
प्रेमी समजून भावा-बहिणीला झाडाला बांधून जबर मारहाण
महिलेचा नवराही फोन करून लोकांना सांगत होता की, ज्यांना त्यानी बांधले ते भाऊ-बहीण आहेत, पण लोकांनी ते मान्य केले नाही. तासाभरानंतर पोलिसांनी दोघांची सुटका केली. ही घटना पिपलोद येथील बामंडा गावातील आहे. याप्रकरणी शुक्रवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री तीन आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, झारीखेडा येथील ज्ञानलाल बामंडा गाव हे त्यांची बहीण कलावती यांना भेटण्यासाठी गेले होते.
बहीण घरात एकटीच होती. गावातील काही लोकांना वाटले की नवीन व्यक्ती त्या बाईला भेटायला आली आहे.
लोकांनी जमवून दोघांनाही घराबाहेर काढले.चारित्र्यावर संशय घेऊन
दोघांना झाडाला बांधून 1 तास लाठ्या-काठ्यानी जबर मारहाण करण्यात आली.
दरम्यान कोणीतरी 100 नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी आरोपीच्या तावडीतून सोडवून भावा-बहिणीला रुग्णालयात दाखल केले.
घरात घुसून, बाहेर काढले, अर्धनग्न अवस्थेत मारहाण केली
ज्ञानलालने पोलिसांना सांगितले की तो गाडी चालवतो त्याचा मेहुणा आणि चुलत भाऊ रमेश हे देखील रतलाममध्ये काम करतात. बरेच दिवस तो बहीण कलावतीला भेटू शकला नव्हता. त्या दिवशी मी मोकळा होतो म्हणून तीला भेटायला गेलो. मी आत कॉटवर बसलो होतो, बहीण घरकाम करत होती. इतक्यात आठ-दहा लोकांनी येऊन मला पकडले. माझ्यापाठोपाठ बहिणीलाही घरातून हाकलून दिले. त्यानंतर त्यांना मारत मारत गावाबाहेर नेले. त्याना कडुलिंबाच्या झाडाला दोरीने बांधले. तासभर ते अर्धनग्न अवस्थेत मारहाण करत राहिले.
जमावाने नवऱ्याचेही ऐकले नाही
मारामारीच्या वेळी गावात जमाव जमला. कलावती यांचे पती रमेश यांना कोणीतरी फोनवरून माहिती दिली.
रमेश यांनी फोनवर गावकऱ्यांना सत्य सांगितलं की आम्ही नातेवाईक आहोत,ते दोघे बहीण भाऊ आहेत त्यांना मारू नका.
मात्र हे सांगूनही गुंड गावकरी मारहाण करतच राहिले.
रात्रभर आरोपींचा शोध घेतला, नंतर पकडले गेले
घटनेनंतर ज्ञानलाल आणि त्यांची बहीण कलावती यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिस ठाणे गाठून मारहाणीची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला,
दुपारी गावात गेले असता ते सापडले नाहीत. त्यानंतर रात्री उशिरा एक पथक गावात पोहोचलं आरोपीना पकडण्यात आलं आहे.
मागे व्हॅलेंटाईनच्या दिवशी बजरंग दलाच्या लोकांनी चक्क पती पत्नीला मारहाण केली होती.
दलाई लामा यांचा लहान मुलासोबतचा किस व्हिडिओ नेखळबळ
जातीयवादी पोस्ट करणाऱ्याला ब्रिटन पोलिसांनी केली अटक
Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नका;Wellness forever Medical
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 10,2023 17:57 PM
WebTitle – A brother-sister was tied to a tree and beat up as a lover in madhyapradesh