पंढरपूर : पंढरपूर मधून एक मन हेलवणारी घटना समोर आलीय.पंढरपूरमधील एका शाळेतील विद्यार्थिनीचा पेपर लिहीत असताना अचानक झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.शिक्षकांनी तिला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,या मुलीचे नाव अनन्या अतुल भादुले असून तिचा मृत्यू “ब्रेन हॅम्रेज” ने झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पेपर लिहीत असताना 9 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
सदर घटना काल गुरुवार (19 जानेवारी) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.पंढरपूर येथील अरिहंत इंग्लिश स्कूल मध्ये अनन्या शिकत होती.गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली.त्यांनंतर तिने संपूर्ण पेपर सोडवला.पेपर सुटायला काही मिनिटे शिल्लक असतानाच अचानक अनन्याला झटका आला. तिचे हातपाय वाकडे झाले.तिची अवस्था पाहून शाळेतील शिक्षकांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले,मात्र उपचारपूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. मिळालेल्या अधिक माहितीवरून असे समजते की गेल्या दोन दिवसांपासून अनन्या आजारी होती. तिला ताप येत होता असे समजते.मात्र,तिचा पेपर असल्याने ती शाळेत आली होती.आणि ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिल्ली मध्ये महिला सुरक्षा आयोग अध्यक्षा सुरक्षित नाहीत- स्वाती मालिवाल
सिमी ला भारत मुस्लिम राष्ट्र बनवायचंय,म्हणून बंदी -केंद्र
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 20,2023 10:52 AM
WebTitle – A 9-year-old girl died tragically while writing a exam paper