दक्षिण भारतातील कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांमध्ये हिजाब संदर्भातचा वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. काल एका मुस्लिम विद्यार्थ्यीनीला हिंदुत्ववादी जमावाने जय श्रीराम चे नारे देत घेरण्याचा प्रयत्न केला होता.कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील सरकारी महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींना ऑनलाइन वर्गादरम्यान हिजाब घालू नये असे सांगितले होते. यावर मुस्लीम समाजातील अनेक विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय ऑनलाइन क्लाससाठी होकार दिला मात्र 8 विद्यार्थिनींनी यास विरोध केला.महाविद्यालयाने या विद्यार्थिनींवर बंदी घातली होती.
दुसरीकडे केरळ मध्ये एका मुस्लिम पोलीस कॅडेट विद्यार्थी मुलीने हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती.
ती नाकारण्यात आली आहे.विशेष म्हणजे सुमारे दहा दिवसांपूर्वी केरळ सरकारकडून हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे.
वाचकांना ही माहिती असावी की केरळ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारची सत्ता आहे.
केरळ सरकारने हिजाब वर बंदी का घातली? काय आहे प्रकरण ?
केरळमधील एका मुस्लिम विद्यार्थ्यीनीने स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोजेक्ट (student police cadets (SPC) )
दरम्यान हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती.
विद्यार्थिनीने हिजाब घालण्यामागील कारण धार्मिक श्रद्धा असल्याचे सांगितले होते.
मात्र,यामुळे राज्यातील धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होईल, असे सांगून केरळ सरकारने ही मागणी फेटाळली.
स्टुडंट पोलिस कॅडेट (SPC) प्रोजेक्ट हा एक शालेय-आधारित युवा विकास उपक्रम आहे ज्याचा उद्देश कायद्याचा आदर, शिस्त, नागरी भावना, समाजातील दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, सामाजिक दुष्कृत्यांचा प्रतिकार आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाही समाज निर्माण करणे आहे. त्यांना भविष्यातील नेते म्हणून विकसित करण्यासाठीही प्रशिक्षण दिले जाते.
आपल्या आदेशात, राज्याच्या गृह विभागाने म्हटले आहे की,
सरकार,तीच्या प्रतिनिधित्वाची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर,
याचिकाकर्त्याची मागणी कायम ठेवण्यायोग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, स्टुडंट पोलिस कॅडेट प्रकल्पात अशी शिथिलता विचारात घेतल्यास, इतर समान दलांवरही अशीच मागणी केली जाईल, ज्यामुळे राज्याच्या धर्मनिरपेक्षतेवर लक्षणीय परिणाम होईल. त्यामुळे असे कोणतेही संकेत देणे योग्य नाही. पोलीस कॅडेट प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेशात विशेष धार्मिक पोशाख घालता येणार नाही.असे केरळ सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यापूर्वी, विद्यार्थी पोलिस कॅडेट विभागाने या विद्यार्थ्यीनीला कळवले होते की या प्रकल्पात इस्लामिक श्रद्धेनुसार डोक्यावर स्कार्फ आणि फुल स्लीव्ह ड्रेस घालण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती दिल्यानंतर विद्यार्थीनीने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. विद्यार्थी पोलिस कॅडेटच्या गणवेशात पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि हिजाब घालण्यास परवानगी मिळावी यासाठी विद्यार्थिनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.जी कोर्टाने फेटाळला होती.
तथापि, न्यायालयाने रिट याचिकेत उपस्थित केलेल्या तिच्या तक्रारीबाबत सरकारसमोर निवेदन करण्यास स्वातंत्र्य असल्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यार्थ्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत राज्य सरकारकडे याचिका दाखल केली होती.मात्र राज्यसरकारने सुद्धा ती मान्य केली नाही.
कर्नाटक हिजाब विवाद दिल्लीच्या शाहीन बागेत पोहोचला
कर्नाटकच्या हिजाब वाद आता राजधानी दिल्लीतही पोहोचला असून पुन्हा एकदा शाहीन बाग यामुळे चर्चेत आली आहे. कर्नाटकातील हिजाब वादाच्या विरोधात शाहीन बाग येथे काही मुली उतरल्या आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत. दिल्लीची शाहीन बाग 2019 मध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचे केंद्र बनले आहे.मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांना शाहीनबागेतून हटवण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा आंदोलक शाहीन बाग येथे जमू लागले असून यावेळी ते हिजाबच्या समर्थनार्थ आहेत.
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 09, 2022 22: 03 PM
WebTitle – While the Karnataka hijab controversy started, on the other hand, the Kerala government banned the hijab